ट्रकसाठी पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:01 IST2019-11-03T13:01:47+5:302019-11-03T13:01:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन ट्रक घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार शहादा येथे घडला़ विवाहितेने ...

ट्रकसाठी पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माहेरुन ट्रक घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार शहादा येथे घडला़ विवाहितेने याप्रकरणी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अर्ज सादर केला होता़
सोनाली दिनेश कोळी यांना विवाहापश्चात ऑगस्ट 2011 पासून पती दिनेश सुदाम कोळी, सासरे सुदाम शंकर कोळी, सासू बेबीबाई सुदाम कोळी, दीर मुकेश व दीराणी राधा कोळी सर्व रा़ रामनगर, शहादा यांच्याकडून शारिरिक व मानसिक त्रास देण्यात येत होत़े माहेरुन ट्रक घेण्यासह घरखर्चासाठी पैसे आणावेत म्हणून मारहाण करण्यात येत होती़ छळाला कंटाळून विवाहिते सोनाली यांनी अर्ज सादर करुन तक्रार दिली होती़ त्याची दखल घेत शहादा पोलीस ठाण्यात सर्व पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तारसिंग वळवी करत आहेत़