म्हसावद येथे क्रीडा शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:49+5:302021-07-28T04:31:49+5:30

येथील कुबेर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविकात शहादा तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र पाटील यांनी ...

Sports teachers felicitated at Mhaswad | म्हसावद येथे क्रीडा शिक्षकांचा सत्कार

म्हसावद येथे क्रीडा शिक्षकांचा सत्कार

येथील कुबेर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविकात शहादा तालुका क्रीडा संयोजक भालचंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सेवानिवृत्त झालेल्या क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात प्रा.मणिलाल चौधरी, मुख्याध्यापक छोटूलाल चौधरी, बी.एन. महाजन, वसंत पाटील, जगन्नाथ पाटील, मोहन पाटील, अंबालाल पाटील, व्ही.बी.पाटील, मुख्याध्यापक तुषार जगदाळे, सजन रेहंज्या मोते, वकारखान सत्तार यांचा समावेश होता. क्रीडा शिक्षकातून उत्कृष्ट कामगिरी करणारे, विविध पुरस्कार प्राप्त, शासनाकडून क्रीडा संघटक म्हणून निवड झालेले प्रा.अरविंद कांबळे, प्राचार्य भारत चाळसे, प्रा.राजेंद्र सोनवणे, युवराज पाटील, सुधाकर पाटील, शेख वसीम सुभान, उपमुख्याध्यापक श्रीकृष्ण पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन चतुर पाटील यांनी तर आभार पी.आर.पाटील यांनी मानले.

Web Title: Sports teachers felicitated at Mhaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.