भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे नंदुरबारात उत्स्फूर्त स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST2021-08-19T04:34:03+5:302021-08-19T04:34:03+5:30
नंदुरबार : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे बुधवारी रात्री उशिरा नंदुरबारात आगमन झाले. शहरातील ...

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे नंदुरबारात उत्स्फूर्त स्वागत
नंदुरबार : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेचे बुधवारी रात्री उशिरा नंदुरबारात आगमन झाले. शहरातील साक्रीनाका चौफुलीवर यात्रेचे स्वागत करण्यात आले. साक्री नाका ते निझर रोड यादरम्यान ठिकठिकाणी विविध संस्था, पदाधिकारी यांच्यातर्फे यात्रेचे स्वागत केेले गेले.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. धुळे जिल्ह्यातून नंदुरबारात यात्रा दाखल झाली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास साक्रीनाका चौफुलीवर जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले.
भाजपचे जिल्हाप्रमुख विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित, जिल्हा संघटक नीलेश माळी आदींसह सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यात्रेच्या स्वागतासाठी विविध कलापथके दाखल झाली होती. यात्रेच्या मार्गावर अर्थात बाबा गणपती, जळका बाजार, सोनारखुंट, हाटदरवाजा, उड्डाणपूल, गिरिविहार चौक, सिंधी कॉलनी, सीबी पेट्रोल पंप आदी ठिकाणी विविध संघटना, संस्था व पदाधिकारी यांनी स्वागत केले.
यात्रा गुरुवारी तळोदा तालुक्यात जाणार आहे. तत्पूर्वी सकाळी आरोग्य राज्यमंत्री पवार जिल्हा रुग्णालयात पाहणी करणार आहेत.