नंदुरबारात जनता कर्फ्यूला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:19+5:302021-03-28T04:29:19+5:30
नंदुरबार : दोन दिवशीय जनता कर्फ्यूला नंदुरबारात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिक स्वत:हून सामिल झाल्याने शहरासह लगतच्या वसाहतींमध्ये ...

नंदुरबारात जनता कर्फ्यूला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार : दोन दिवशीय जनता कर्फ्यूला नंदुरबारात पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिक स्वत:हून सामिल झाल्याने शहरासह लगतच्या वसाहतींमध्ये देखील शुकशुकाट होता. रविवारी देखील जनता कर्फ्यू राहणार आहे.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नंदुरबारसह सहाही तालुका मुख्यालयांच्या शहरात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शनिवारी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात येणाऱ्या चारही रस्त्यांवर बॅरीकेटींग लावण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. अत्यावश्यक सेेवेतील कर्मचारी, रुग्ण व त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांनाच केवळ शहरात प्रवेश दिला जात होता. काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या टारगट युवकांवर पोलिसांनी कारवाई केली.
रविवारी देखील जनतेने असाच प्रतिसाद देऊन कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सायंकाळी फिरणाऱ्यांवर कारवाई
जनता कर्फ्यू व १ तारखेपासूनच्या लॅाकडाऊनच्या कालावधीत सायंकाळी फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे. वसाहतींच्या भागात तसेच मोकळ्या मैदानांवर सायंकाळी फिरणाऱ्यांचे प्रमाण अशा कालावधीत वाढत असते. त्यामुळे पोलिसांनी अशांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दुसरीकडे नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळून अशा प्रकारांना तिलांजली दिली तर कारवाईची वेळ येणार नाही.