ऑनलाईन उद्बोधन वर्गास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:15+5:302021-01-10T04:24:15+5:30
येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील ...

ऑनलाईन उद्बोधन वर्गास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद
येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक शास्त्र सीआरजी सदस्य तसेच इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणारे सामाजिक शास्त्राचे विषय शिक्षक यांच्यासाठी दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील शिक्षणशास्त्र विभागाच्या संचालिका डॉ.कविता साळुंखे, मराठा विद्या प्रसारक महाविद्यालय नाशिकचे प्राचार्य प्रा.प्रताप पत्रे, प्रा. डॉ.ज्योती लष्करी, अक्कलकुवा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिता थोरात, अभोणा शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक हे उपस्थित होते.
दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे येथील सामाजिक शास्त्र विभागाच्या उपसंचालिका डॉ.कमलादेवी आवटे तसेच डॉ.दत्ता थिटे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.जगराम भटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींशी संवाद साधून संबंधित विषयांच्या मार्गदर्शनाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन प्रशिक्षणाच्या शिस्त व नियम याबाबत शिक्षकांना संबोधित केले. संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनीदेखील प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधून सामाजिक शास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन सामाजिक शास्त्र विषय प्रमुख पंढरीनाथ जाधव यांनी केले. तज्ज्ञ मार्गदर्शकांचा परिचय अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार यांनी करून दिला. सामाजिक शास्त्राचे विषय सहाय्यक प्रकाश भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेसाठी संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता तसेच विषय सहाय्यक संदीप पाटील, आयटी तज्ज्ञ गोविंद वाडीले या सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेसाठी ग्यानप्रकाश फाउंडेशनने ऑनलाइन झूम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सोनल शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेची सदस्य मर्यादा ३०० शिक्षक असताना सर्व शिक्षक सहभागी झाले. संबंधित तज्ज्ञांचे व्याख्यान रेकॉर्डिंग करून हे डायट नंदुरबार चॅनलवर टाकण्यात येणार असून, सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण यांनी केले आहे.