आदिवासी एकता महासंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:33 AM2021-01-19T04:33:47+5:302021-01-19T04:33:47+5:30

नंदुरबार : आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनात विविध राज्यांतील हजारो आदिवासींनी उपस्थिती लावली. या संम्मेलनात आदिवासींच्या ...

In the spirit of the Tribal Solidarity Convention | आदिवासी एकता महासंमेलन उत्साहात

आदिवासी एकता महासंमेलन उत्साहात

Next

नंदुरबार : आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनात विविध राज्यांतील हजारो आदिवासींनी उपस्थिती लावली. या संम्मेलनात आदिवासींच्या सांस्कृतिक वारसासह विविध विषयांवर चर्चा झाली.

आदिवासी एकता परिषदेतर्फे गेल्या २७ वर्षांपासून आदिवासी एकता महासंमेलन भरविले जाते. यंदा २८वे महासंमेलन मध्य प्रदेशातील झाबुआ येथे झाले. या संमेलनात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दादरा नगरहवेली या राज्यांसह यंदा दिल्ली, आंध्र प्रदेश, ओरिसातीलही विशेष प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील साहित्यिक दामू ठाकरे होते. या वेळी काळुराम धोदडे, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, अशोक चौधरी, धुपेशभाई चौधरी, पोरलाल खरटे, डाॅ.शांतीकर वसावा, माजी खासदार अमरसिंग चौधरी, डोंगर बागुल, राजू पांढरा, प्रभू टोकीया, साधना मिना, जीवराम दामू, कुसूम आलाम, किर्ती वरठा, प्रेमचंद सोनवणे आदी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून आदिवासी समाज अशा संमेलनाच्या माध्यमातून एकत्र आला पाहिजे, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी एकत्रितपणे आवाज बुलंद केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आदिवासी संस्कृतीत श्रम, समूह, प्रेम, विश्वास, समता, बंधुता, अशी मानवता वादी जीवनमूल्ये आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याचेही या संस्कृतिचे प्रतीक आहे. त्यामुळे संस्कृतीचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन दामू ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

संम्मेलनाची सुरुवात एकता सांस्कृतीक रॅलीने झाली. यात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. दाेन दिवस चाललेल्या या संमेलनात आदिवासींच्या विविध प्रश्नांवर विविध सत्रातून चर्चा झाली. यावेळी आदिवासींचे देव-देवता व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले हाेते.

Web Title: In the spirit of the Tribal Solidarity Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.