भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:47 IST2020-10-02T15:47:01+5:302020-10-02T15:47:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना वळण रस्त्यावरील जानता राजा चौकात घडली. ...

भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, एकजण जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना वळण रस्त्यावरील जानता राजा चौकात घडली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव संजय पाटील (२९) रा.चाळीसगाव असे मयताचे नाव आहे. गौरव पाटील हे २९ रोजी रात्री साडेअकरा वाजता आपल्या दुचाकीने जात असतांना वळण रत्यावर त्यांना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात पाटील यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. याबाबत पोलीस कर्मचारी अरुण चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक निरिक्षक सोमनाथ दिवटे करीत आहे.