शहाद्यात शिवजयंतीच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:26 IST2020-02-17T12:25:52+5:302020-02-17T12:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिवजयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात सुरुवात झाली आहे. येथील ...

Speed in preparation for Shiv Jayanti in martyrdom | शहाद्यात शिवजयंतीच्या तयारीला वेग

शहाद्यात शिवजयंतीच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शिवजयंतीनिमित्त युवकांमध्ये उत्साह संचारला असून शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे झेंडे लावण्यात सुरुवात झाली आहे. येथील संघटनांसह तरुणांनीही विधायक उपक्रम राबविण्याच्या संकल्प केला आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेघेत भगवे ध्वज, टोप्यासह विविध प्रकारचे टॅटू, लहान व मोठ्या आकाराचे ध्वज, मोटारसायकल व चारचाकी वाहनांना लावण्यासाठी लहान आकाराचे भगवे ध्वज, शर्टला लावण्यासाठी बॅच, हातात बांधण्यासाठी बँड, महाराजांचा फोटो असलेले स्टीकर, गळ्यातील मफलर आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा शहरात शिवजयंतीचा उत्साह अधिक दिसून येत आहे.
सकल मराठा समाज, समस्त शिवप्रेमी व शिवस्मारक समिती शहादा यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता कोर्टाजवळील गणपती मंदिर येथे साहित्यिक व व्याख्याते डॉ.संजय कळमकर (नगरकर) यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीला शहरातील स्टेट बँकसमोरील महात्मा ज्योतीबा फुले चौकात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव समितीतर्फे देण्यात आली.

Web Title: Speed in preparation for Shiv Jayanti in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.