दशा माता उत्सवाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:21 IST2019-07-28T12:21:37+5:302019-07-28T12:21:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दशामाता मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या किमती ...

Speed up the preparation for the Dasha Mata festival | दशा माता उत्सवाच्या तयारीला वेग

दशा माता उत्सवाच्या तयारीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दशामाता मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.यावर्षी ग्राहकांची मागणी मंदावली असून, रंगांच्या किमती वाढल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केले आहे.लहान मोठ्या मूत्र्यांच्या दर स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दशा मातेच्या उत्सव हा मूळच्या गुजरात राज्यातील असला तरी नंदुरबार जिल्हा सीमावर्ती भाग असल्यामुळे गेल्या बारा ते पंधरा      वषार्पासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. येत्या 31 जुलैला मातेची स्थापना करण्यात येत असल्यामुळे कारागिरांनी मुत्र्या साकारण्याचा वेग दिलेला आहे. शहरात तीन ते चार कारागिरांकडून मुत्र्या बनविण्याचे काम सुरू आहे.
अहिल्याबाई विहिर समोर असलेले कारागीर परेश सोनार व सागर सोनार यांनी गेल्या 4 ते 6 महिन्यापासून मूर्ती बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्याकडे एक फुटापासून ते साडे पाच फुटापयर्ंत मूत्र्या आहेत. प्रत्येक मूत्र्यांच्या दर वेगवेगळा आहे. यंदा रंगांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नसून ग्राहकांची मागणी मंदावलेली  आहे. 
मात्र कारागिरांनी दर जैसे थे ठेवल्याची माहिती परेश सोनार व सागर सोनार यांनी दिली. शहरात कुशल कारागीर असल्यामुळे भाविकांकडून सहा महिन्यापूर्वीच मुत्र्यांची खरेदीसाठी नोंदणी करण्यात येते. गुजरात व    मध्य प्रदेशातून देखील मुत्र्या खरेदी      करण्यासाठी भाविक येत असतात. कारागिरांकडून आता मूत्र्यांना रंग-रंगोटी देण्याचे काम सुरू     आहे.
जवळजवळ काम अंतिम टप्प्यात आले आहे. मूत्र्यां जास्तीत जास्त आकर्षक बनविण्यासाठी कारागिरांच्या असून, वेगवेगळ्या आकाराचे शोभिवंत आभूषणांच्या मूर्तीवर साज चढविण्यात येत आहे. अशा साजलाही मोठी मागणी वाढली आहे.    
 

Web Title: Speed up the preparation for the Dasha Mata festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.