नंदुरबार शहरात कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:50+5:302021-03-14T04:27:50+5:30
या मोहिमेंतर्गत शहरात १० पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय ...

नंदुरबार शहरात कोरोना चाचणीसाठी विशेष मोहीम
या मोहिमेंतर्गत शहरात १० पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय बँक चौक, शहर पोलीस ठाण्याजवळ, नेहरू चौक येथे स्थिर पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तर सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट ते कोरीट नाका, धुळे चौफुली ते बस स्थानक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागात फिरत्या पथकांमार्फत व्यावसायिकांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. या मोहिमेसाठी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी जयेश सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभत आहे. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे. दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत ५४३ ॲन्टीजन चाचण्या झाल्या होत्या. त्यापैकी १८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.