रिक्षा लावण्याच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:18 IST2019-10-01T12:18:40+5:302019-10-01T12:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण केली़ शनिवारी रात्री घडलेल्या ...

रिक्षा लावण्याच्या वादातून हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण केली़ शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली आह़े
शनिवारी रात्री मौसीन अब्दुल सत्तार मोमीन हा रेल्वेस्थानक रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावत असताना वाल्मिक लक्ष्मण पाटील याने वाद घातला़ दोघांमध्ये वादावादी वाढल्यानंतर वाल्मिक याने हातातील लाकडी दांडा थेट मोसीन मोमीन याच्या डोक्यात टाकला़ यावेळी घटनास्थळी असलेल्या एकाने मोसीन मोमीन यास हाताबुक्कीने मारहाण केली़ घटनेमुळे रेल्वेस्टेशन व परिसरात थांबून असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरुन काही काळ तणाव निर्माण झाला होता़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली होती़
याबाबत मोसीन अब्दुल सत्तार मोमीन याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाल्मिक लक्ष्मण मराठे रा़विरसावरकर नगर व आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक नंदवाळकर करत आहेत़
मारहाणीत जखमी झालेल्या मोसीन याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ दरम्यान रविवारी रात्री उशिरा पोलीसांनी संशयित वाल्मिक मराठे यास अटक केली आह़े