पाया बांधकामावर घर ऐवजी केली पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:13 IST2019-09-03T12:13:29+5:302019-09-03T12:13:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन वसाहतींमध्ये बाधितांकडून मोठय़ा प्रमाणावर आपापल्या घराच्या ...

पाया बांधकामावर घर ऐवजी केली पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन वसाहतींमध्ये बाधितांकडून मोठय़ा प्रमाणावर आपापल्या घराच्या पायाचे बांधकाम करण्यात केले आहे. घर पायासाठी एक लाख रूपये त्यांना शासनाकडून देण्यात आले होते. मात्र यानंतर दुस:या टप्प्याच्या अनुदानाला उशिर झाल्याने या घरपाया बांधकामात धानपिकाची तसेच भेंडी, वांगे यासारख्या पिकांची लागवड पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांनी केली आहे. त्या चांगल्या बहारात आल्या असून, चांगले उत्पन्न मिळणार आहे.
दरम्यान धानपिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन अनुकूल राहत असल्याने घरपाया बांधकामानंतर खोलगट कप्पे तयार झाल्याने यात धानपिकाचे उत्पादन चांगले येणार असल्याचे बाधितांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान संबंधितांना दुस:या टप्प्यातील अनुदान त्वरित देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अनेक प्रय}ानंतर पाया बांधकामासाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे. हे अनुदान आता तत्काळ देवून प्रकल्पग्रस्तांच्या घरांना आधार द्यावा, अशी मागणी आहे.