निवडणूक लागताच भरारी पथके होणार सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:25 IST2019-09-18T12:25:46+5:302019-09-18T12:25:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीवर अधिकधीक भर देण्यात यावा. निवडणूक जाहीर होताच ...

As soon as the election begins, heavy squads will be activated | निवडणूक लागताच भरारी पथके होणार सक्रीय

निवडणूक लागताच भरारी पथके होणार सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीवर अधिकधीक भर देण्यात यावा. निवडणूक जाहीर होताच भरारी पथकांची नियुक्ती करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका:यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. डॉ.भारूड म्हणाले, मतदारांच्यादृष्टीने निवडणूक प्रक्रीया अधिकाधीक सुलभ करण्याकडे लक्ष द्यावे. दिव्यांग मतदारांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. मतदान केंद्रस्तरापयर्ंतचा सुक्ष्म आराखडा तयार करावा. मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून लोकसभा निवडणूकीत कमी मतदान झालेल्या केंद्रावर अधिकाधीक मतदान होईल यासाठी विशेष प्रय} करावे. मतदानासाठी आवश्यक पूर्वतयारी वेळेत पुर्ण करावी. त्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यात यावा. मतदान केद्रांना भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घ्यावी. निवडणूक प्रक्रीया पारदर्शकपणे आणि शांततेच्या वातावरणात पूर्ण होईल आणि निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. 
दिलीप जगदाळे यांनी आदर्श  आचारसंहिता अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन केले. आचारसंहितेचे कठोरपणे पालन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा व आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारींची त्वरीत दखल घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी गोगटे व खांदे यांनी निवडणूक प्रक्रीयेसंदर्भात मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीसाठी शहादा विधानसभा मतदार संघात चार तर नंदुरबार येथे एक सहायक मतदान केंद्रासाठी तर नवापूर पाच व अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तीन मतदान केंद्रांच्या जागा बदलाबाबत निवडणुक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.    

निवडणूक कर्मचा:यांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्यात यावे. उमेदवारांचा निवडणूक खचार्बाबत काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे. त्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यावर त्वरीत भरारी पथकांची नियुक्ती करावी. 1950 या     क्रमांकावर येणा:या तक्रारींचे निराकरण करावे. निवडणुकीसाठीचा वाहतूक आराखडा त्वरीत तयार करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिका:यांनी दिले.
 

Web Title: As soon as the election begins, heavy squads will be activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.