ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे सोनवल ग्रामस्थांना दाखले मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:52+5:302021-07-31T04:30:52+5:30
ग्रामस्थांना लागणारे जन्म-मृत्यू व इतर दाखले तसेच शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र सोनवल ...

ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे सोनवल ग्रामस्थांना दाखले मिळेनात
ग्रामस्थांना लागणारे जन्म-मृत्यू व इतर दाखले तसेच शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र सोनवल तर्फ बोरद येथील ग्रामसेवकांकडून देण्यात येणारे दाखले गेल्या काही दिवसांपासून मिळत नसल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांबाबत चर्चा व नियोजन करून विकास व्हावा, हा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उद्देश असतो. गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत कोरोना महामारीमुळे काही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना मृत्यूचा दाखला आवश्यक आहे. मात्र ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे विविध दाखले मिळण्यास विलंब होत आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन ग्रामसेवकास नियमित उपस्थित राहण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.