नगारे येथे पुत्राची पित्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:30 IST2019-07-04T12:30:32+5:302019-07-04T12:30:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नगारे येथे किरकोळ वादातून मुलाने 65 वर्षीय पित्यास मारहाण करुन बचावासाठी आलेल्या ...

नगारे येथे पुत्राची पित्यास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील नगारे येथे किरकोळ वादातून मुलाने 65 वर्षीय पित्यास मारहाण करुन बचावासाठी आलेल्या महिलेलाही मारहाण करत जखमी केल़े सोमवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली़
विरसिंग इस:या नाईक हे सोमवारी सायंकाळी घरात असताना त्यांचा मुलगा भामटय़ा याने घराच्या पडवीवरुन वाद घातला़ दरम्यान त्याने वडील विरसिंग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी बचावासाठी आलेल्या रोहिणी नामक महिलेच्या डोक्यात विटेचा तुकडा मारुन दुखापत केली़ दोघांना वाचवण्यासाठी आलेल्या सुदाम नामक व्यक्तीस भामटय़ा याच्यासोबत असलेल्या खिमा देवजी वसावे व अमित देवजी वसावे या दोघांनी मारहाण केली़ दरम्यान तिघांनी एमएच 41 सी 2771 या रिक्षाचे पडदे फाडून व घराचा दरवाजा तोडून नुकसान केल़े
याप्रकरणी विरसिंग नाईक यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भामटय़ा नाईक, खिमा वसावे व अमित वसावे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गावीत करत आहेत़