सोनपोत चोरणा-यास महिलेने दिले पकडून : नंदुरबार बसस्थानकात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:03 IST2018-02-19T12:02:55+5:302018-02-19T12:03:33+5:30

Sonopot Chorana-woman gets possession of: incident in Nandurbar bus station | सोनपोत चोरणा-यास महिलेने दिले पकडून : नंदुरबार बसस्थानकात घटना

सोनपोत चोरणा-यास महिलेने दिले पकडून : नंदुरबार बसस्थानकात घटना


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसमध्ये चढत असताना गळ्यातील सोनपोत लांबवणा:यास महिलेनेच पकडून देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े रविवारी दुपारी नंदुरबार बसस्थानकात हा प्रकार घडला़
सविता केशव बोबडे (60) रा़ धुळे ह्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे बायपास बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत कोणीतरी ओढल्याचे लक्षात आल़े मागे पाहिले असता, मारूती सखाराम गायकवाड (40) रा़ खोकरमोहा जि़बीड हा संशयास्पदरित्या काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े त्यांना त्याची कॉलर पकडत थेट चोप देण्यास सुरूवात केली़ यावेळी तेथे उपस्थित नागरिक व एसटीच्या कर्मचा:यांनी त्याची झडती घेऊनही त्याच्याकडून 60 हजार रूपये किमतीची सोनपोत मिळून आली नाही़ सविता बोबडे यांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणल़े
सविता बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मारूती गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील करत आहेत़
पोलीसांनी संशयिताची झडती घेऊनही मुद्देमाल मिळूना आला नसल्याने इतर संशयितांची माहिती काढली जात आह़े

Web Title: Sonopot Chorana-woman gets possession of: incident in Nandurbar bus station