घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर : तळोदा पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:04 IST2019-02-15T12:04:17+5:302019-02-15T12:04:23+5:30
तीन कोटी रुपये खर्च, खत निर्मितीही होणार

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर : तळोदा पालिका
तळोदा : नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी साधारण पाऊणे तीन कोटी रुपयेदेखील उपलब्ध करुन दिले आहेत. प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेनेही टेंडरची प्रक्रिया हाती घेतल्यामुळे लवकरच कामही सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कचरा डेपोतील सततच्या दरुगधीने आजूबाजूच्या रहिवाशांना यातून सुटका होणार आहे.
शहरातील कचरा संकलनासाठी येथील नगरपालिकेने नजीकच्या चिनोदा रस्त्यावर 2005 मध्ये कचरा डेपो उभारला होता. यासाठी पालिकेने स्वत:ची साधारण अडीच एक जागा वापरली आहे. तथापि, या कचरा डेपोत शहरातील कच:याबरोबरच गटारींचा गाळ पालिका तेथे टाकत असल्यामुळे आजूबाजूच्या वसाहतींमधील रहिवाशांबरोबरच पादचा:यांनाही सतत दरुगधीचा त्रास सहन करावा लागत असे. साहजिकच यामुळे पालिकेने आपला हा कचरा डेपो इतरत्र हलवावा, अशी मागणी पालिकेकडे केली जात होती. शिवाय या कचरा डेपोमुळे त्याला लागून असलेल्या जमिनीची एन.ए. (बिनशेती) प्रक्रियाही थांबली होती. परिणामी शहरीकरणाची गती मंदावली होती. त्यातही तेथील प्लास्टीक पिशव्यांचा कचरा हवेमुळे आजूबाजूच्या वसाहतींमध्ये सतत उडत असल्यामुळे रहिवासी प्रचंड वैतागले होते. मेलेली जनावरे तेथेच टाकली जात होती. त्याच्या दरुगधीनेही नागरिक वैतागले होते. या पाश्र्वभूमीवर पालिकेने येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. साधारण दोन कोटी 89 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे जानेवारी 2019 मध्ये पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पालिका प्रशासन आणि पदाधिका:यांनी मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील हायपॉवर कमिटीने तातडीने कार्यवाही करून या प्रकल्पास मान्यता दिली. त्याचबरोबर प्रकल्पासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार पालिकेनेही प्रकल्प उभारण्यासाठी टेंडरची प्रक्रिया राबवली असून लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्याच्या कामास तताडीने गती देऊन लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.