शहादा पालिका सभेत सौर उर्जेवरील स्नानगृहाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:31 IST2020-06-26T12:31:50+5:302020-06-26T12:31:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व नागरीकांचा सामुहिक विमा काढणे, दलित व आदिवासी वस्तीत सौर ऊर्जेवर कार्यरत स्नानगृह, ...

Solar powered bathroom approved at Shahada Palika Sabha | शहादा पालिका सभेत सौर उर्जेवरील स्नानगृहाला मंजुरी

शहादा पालिका सभेत सौर उर्जेवरील स्नानगृहाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील सर्व नागरीकांचा सामुहिक विमा काढणे, दलित व आदिवासी वस्तीत सौर ऊर्जेवर कार्यरत स्नानगृह, महानुभाव पंथीय दफनभूमी, सोलर स्ट्रिट लाईटसह विविध विकास कामांना येथील पालिकेच्या गुरूवारी झालेल्या सर्व साधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेने बांधलेल्या नूतन टाऊन हॉलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून घेण्यात आली. या वेळी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गटनेते प्रा.मकरंद पाटील, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी वीरमरण आलेले जवान, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेला विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक ३२ शहरातील ई-पोल नसलेल्या विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार सोलार एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे हा विषय रद्द करून इतर सर्व विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी सभेपुढे आलेल्या विषयांनाच मंजुरी देण्यात यावी जे विषय पटलावर आले नाही त्यांना मंजुरी देऊ नये. त्याच बरोबर कोणत्याही गोष्टीची निविदा काढताना भविष्याचा विचार करूनच काढावी, जेणेकरून त्यात वाढ करावी लागणार नाही असे सांगितले. नगरसेवक नाना निकुंबे यांनी विपश्यना केंद्र मंजूर झाल्याने सर्वांचे आभार मानले.
नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी शहरात वास्तव्यास असलेल्या महानुभावपंथीय नागरिकांना दफनभूमीसाठी जागा देण्याची मागणी केली. या वेळी नगरसेवक संदीप पाटील, सभापती लक्ष्मण बढे, वसीम तेली, विद्या जमदाडे, इक्बाल शेख आदींसह विविध नगरसेवक, सभापतींनी चर्चेत सहभाग नोंदविला. याप्रसंगी नितीन सुरेश नाईक यांना नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्यात आले.

शहरात कोरोनाची साथ पसरू नये यासाठी पालिका विविध स्तरावर उपाययोजना राबवत आहे. तसेच शहरात रूग्णांची साखळी तोडण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी विविध स्तरावरून परिश्रम घेत आहेत. यासाठी नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

Web Title: Solar powered bathroom approved at Shahada Palika Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.