सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:36 IST2020-03-02T11:36:01+5:302020-03-02T11:36:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे ...

Solar panels facilitate convenient telecommunication services | सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

सौर पॅनलमुळे मोलगीत दूरसंचार सेवा सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नियमित वीज पुरवठा होत नसल्याने मोलगीतील बीएसएनएल टॉवरमधून सेवाच मिळत नव्हती, यातून बीएसएनएल टिकेचे धनी ठरले. बहुतांश कामे आॅनलाईन झाली, परंतु मोलगीत सेवेअभावी कामे होत नसल्याने तक्रारी वाढल्या. असे असतांनाच राज्यपाल कोश्यारी दौऱ्यावर आले, दरम्यान दूरसंचार सेवेबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यानुसार टॉवरसाठी स्वतंत्र सौर उर्जेचे पॅनल मजूर करीत दूसंचार सेवा सुरळीत करण्यात आली.
दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणांपैकी मोलगी हे गाव असून तेथे तीन राज्यातील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तेथे सर्वच सुविधांची आवश्यकता भासत असते. परंतु सद्यस्थितीत अतिमहत्वाची ठरणारी दूरसंचार सेवाच मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार नागरिकांमार्फत तक्रारी करण्यात आल्या. तर आॅनलाईन कामे रखडत असल्याने ग्रहकांमधील संतापाची तीव्रताही वाढली. दरम्यान संतप्त ग्राहकांकडून टॉवर जाळण्याची तयारीही करण्यात आली होती. काही महिन्यापासून सेवा पूर्णत: बंद पडली असतांनाच राज्यपाल कोश्यारी हे मोलगी दौºयावर आले होते.
राज्यपालांच्या दौºयाच्या वेळेसही दूरसंचार विभागाची हीच परिस्थितीत तेथे पाहायला मिळाली. तर नागरिकांकडूनही याबाबत काही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारींचा आढावा घेतता असता. वीज वितरणकडून पुरेसा वीज पुरवठा होत नसल्यामुळे दूरसंचारच्या सेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. तेथील सेवेची गरज लक्षात घेत बीएसएनएलमार्फत मोलगी टॉवरसाठी स्वतंत्र सौर पॅनल मंजूर झाले. त्यामुळे मोलगीसह परिसरातील ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणार असल्याची माहिती अभियंता तसेच केंद्राचे प्रभारी गिरासे यांनी दिली.

४नव्याने बसविण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलची क्षमता तीन किलो वॅट आहे. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. या टॉवरची क्षमता पाच किलो मिटरची असल्याचे सांगण्यात येत असल्याने मोलगीकर, बाजार व अन्य कामानिमित्त येणारे नागरिकांसह भगदरी, काठी, निंबीपाडा, बिजरीपाटी, साकलीउमर, बोतवा, उखिल्ली सोरासापडा बिजरीगव्हाण येथील ग्राहकांनाही या टॉवरच्या माध्यमातून सेवा मिळणार आहे.

४खंडीत वीज पुरवठ्यामुळे दूसंचारच्या सेवेवर मोठा परिणाम होत होता. अपेक्षित वीज पुरवठा करण्यासाठी बीएसएनएलकडून वीज वितरणकडे वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बीएसएनएलने स्वतंत्र सौर ऊर्जेचे पॅनल उपलब्ध करुन देण्यासाठी निती आयोगाकडे दि. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रस्ताव देत मागणी केली होती. प्रस्ताव दाखल केल्यानंतरही पाठपुरावा करण्यात आला. परंतु या पॅनलसाठी कुठल्याही हालचाली होतांना दिसून आल्या नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर होण्याची कुठलीही प्रतिक्षा न करता बीएसएनएलमार्फतच स्वतंत्र पॅनल मंजूर करण्यात आले आहे.

Web Title: Solar panels facilitate convenient telecommunication services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.