सौर ऊर्जा सर्वांसाठीच उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:53 IST2020-08-22T12:53:15+5:302020-08-22T12:53:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाढत्या मागणीमुळे राज्यात वेळोवेळी वीजेचा तुटवटा निर्माण होवून पुरवठ्यात अडचणी येत आहेत़ या पार्श्वभूमीवर ...

सौर ऊर्जा सर्वांसाठीच उपयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाढत्या मागणीमुळे राज्यात वेळोवेळी वीजेचा तुटवटा निर्माण होवून पुरवठ्यात अडचणी येत आहेत़ या पार्श्वभूमीवर बऱ्याच नागरिकांसह शासकीय कार्यालयात सोलर वीज प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत़ यात बहुतांश सोलर वीजेचा प्रयोग यशस्वी तर एकदोन ठिकाणी प्रयोग फसला असल्याचे दिसून आले आहे़
‘लोकमत’ने शहरातील उद्योग व्यवसाय प्रतिष्ठानांसह शासकीय कार्यालयात पाहणी करुन सोलर युनिटमधून मिळणाºया वीजेची पडताळणी केली होती़ यात आॅनग्रीड पद्धतीने छतांवर लावलेले सोलर पॅनल हे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असून त्यातून वीज बचतही होत आहे़ बºयाच जणांना यातून शून्य वीज बिलाचा अनुभवही येत आहे़ वातावरणीय बदलातही सोलर सिस्टीम विनासायस सुरू राहत असल्याने वीजेचा प्रश्न निकाली निघाला असल्याचे यावेळी दिसून आले़ यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या छतावर लावण्यात आलेले सोलर पॅनल सर्वाधिक चांगल्या प्रकारे काम करुन वीज बचत करत असल्याची माहिती समोर आली़ शहरातील छोट्या-मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानांकडूनही सोलर सिस्टीम लावत विजेची बचत केली आहे़ वीज कंपनीकडून अशा ग्राहकांसाठी प्रोत्साहनपर योजनाही राबवण्यात येत आहेत़
शहरातील बºयाच ठिकाणी आॅनग्रीड पद्धतीनेच सोलर पॅनल लावून वीज निर्माण केली जात आहे़ यात प्रामुख्याने पाणी गरम करणे आणि वीज निर्मिती असे दोन प्रकार आहेत़ पावसाळ्यातील ढगाळ वातावरणातही सौर ऊर्जा निर्माण होत आहे़ यातून घरगुती वापराच्या वीजेचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघून सौर ऊर्जा सर्वांसाठीच उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे़ ४सौर ऊर्जा निर्मितीच्या आॅनग्रीड आणि आॅफग्रीड अशा दोन पद्धती आहेत़ ज्याठिकाणी वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होतो़ त्याठिकाणी आॅफग्रीड पद्धतीचा वापर करुन बॅटरी लावण्यात येतात़ तर ज्या ठिकाणी वीज पुरवठा नियमित होतो़ त्याठिकाणी आॅफग्रीड पद्धतीने सोलर सिस्टीमचा वापर करण्यात येतो़ या पद्धतीत दर दिवशी किमान चार ते ४०० युनिट वीज निर्मिती करुन तिचा वापर शक्य आहे़ मोठ्या प्रकल्पानुसार या वीजेची निर्मिती शक्य आहे़ यातून बºयाच व्यावसायिकांना दर महिन्याला येणारा वीज बिलाचा खर्च हा नगण्य झाला आहे़ एकदोन जणांना शून्य वीज बिल येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दर दिवशीची वीज निर्मितीही वाढली आहे़ ४नंदुरबार जिल्हा परिषदेच्या छतावर ५० किलोव्हॅटचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे़ यातून आजघडीस जिल्हा परिषदेचा विजेचा खर्च हा ५० टक्के झाला आहे़ एका पॅनलमधून ३३० व्हॅट वीज उत्पादित करण्याचे ध्येय ठेवत याठिकाणी १४२ पॅनल लावले आहेत़ यातून ११ हजार युनिट वीज दरमहिन्याला निर्माण होवून विजेचा प्रश्न सोडवण्यात आला आहे़
४शहरातील मध्यवस्तीतील सराफ बाजारात १० ते २५ व्हॅटपर्यंत सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत़ यातून दर दिवशी किमान ५० युनिट वीज निर्मिती करुन त्याचा वापर केला जात आहे़ या व्यावसायिकांचा वीजेचा खर्च कमी झाला आहे़
४नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर लावलेला सोलर पॅनल मात्र खराब झाल्याचे चित्र आहे़ दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या बॅटºया काही दिवसात खराब झाल्याने हा प्रकल्प सुरूच होवू शकलेला नाही़ आॅनग्रीड पद्धतीने जिल्हा परिषदेवर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत़ यातून दर महिन्याला किमान ११ हजार युनिट वीज निर्माण होत आहे़ ही वीज जिल्हा परिषद इमारतीतच वापरली जाते़ या पद्धतीत शिल्लक असलेली वीज विज कंपनीला वापरासाठी दिली जात आहे़ यामुळे वीज बिलात सूट मिळून नंदुरबार जिल्हा परिषदेचा वीज वापराचा खर्च हा ५० टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे़
-प्रमोद भदाणे, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद, नंदुरबाऱ