दुर्गम भागात सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:24 IST2019-11-16T12:24:36+5:302019-11-16T12:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील गाव पाडय़ांमध्ये सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या सुचना खासदार ...

दुर्गम भागात सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी योजना
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील गाव पाडय़ांमध्ये सौर उज्रेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ‘हर घर नल हर घर जल’ योजनेवर चर्चा करण्यात आली. याशिवाय राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा आढावा घेण्यात आला. महाऊर्जा अंतर्गत विद्युतीकरण, सौभाग्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या, दुर्गम भागातील दुर्गम पाडय़ांवर वीज पोहोचविण्यासाठी महाऊर्जा आणि महावितरणने समन्वयाने काम करावे. ग्रामसेवकांमार्फत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन तेथे वीज जोडणी देण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. डिसेंबर अखरेपयर्ंत हा अहवाल सादर करण्यात यावा. अहवालानुसार केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल.
तोरणमाळ वीज उपकेंद्राच्या कामासही प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. ‘हर घर जल’ ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून योजनेनुसार प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी द्यावयाचे असल्याने नळ पाणी पुरवठा योजनांना गती देण्यात यावी. दुर्गम भागात नळाद्वारे पाणी देण्यासाठी सोलर पंप उपयुक्त ठरतील, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. प्रस्ताव तयार करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात यावे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बेसलाईन सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना शौचालय बांधून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. गरजेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे घेण्यात यावीत.
दुर्गम डोंगराळ भागातील वीज समस्या तातडीने सोडविण्यासाठी कर्मचा:यांना तेथे उपस्थित राहण्याबाबत वेळापत्रक निश्चित करून द्यावे. महाऊर्जाने या भागातील कुटुंबांना सोलर वीज देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.