शेलवाई येथे शेतकऱ्यांना मृदा आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:31+5:302021-08-20T04:34:31+5:30
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील प्राचार्य डॉ.एस.बी. खरबडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.व्ही. बोराळे, ...

शेलवाई येथे शेतकऱ्यांना मृदा आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कृषी महाविद्यालय नंदुरबार येथील प्राचार्य डॉ.एस.बी. खरबडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.व्ही. बोराळे, प्रा.डी.बी. सूर्यवंशी, डॉ.डी.बी. अहिरे व डॉ.पी.पी. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कार्यानुभव व कृषी औद्योगिक उपक्रम राबवून ग्रामस्थ, शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच कृषी कन्या पल्लवी पराडके व तेजल वळवी यांनी मृदा आरोग्य पत्रिका वितरण अभियानाच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादनात वाढ कशी करावे तसेच रासायनिक व जैविक खते, सेंद्रिय खते व इतर पोषक अन्नद्रव्यांची संतुलित मात्रा देऊन अनावश्यक खर्च कसा टाळता येईल, माती परिक्षणाचे महत्व आणि बी-बियाणांच्या प्रकाराविषयी महत्व सांगितले. या वेळी अनिल पाडवी, सुनील पाडवी, देविसिंग वळवी, अविनाश वळवी, प्रभातसिंग पाडवी, अमरसिंग पाडवी, रणजित पाडवी, गणेश पाडवी आदी उपस्थित होते.