अनिष्ट व खर्चिक चालीरितींना हद्दपारसाठी समाज एकवटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:40 IST2019-09-11T11:40:41+5:302019-09-11T11:40:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समाजाच्या विकासासाठी अनिष्ट चालीरितींना फाटा देत समाज बांधवांनी स्वत:पासून बदल करण्याची गरज असल्याचा सूर ...

अनिष्ट व खर्चिक चालीरितींना हद्दपारसाठी समाज एकवटला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समाजाच्या विकासासाठी अनिष्ट चालीरितींना फाटा देत समाज बांधवांनी स्वत:पासून बदल करण्याची गरज असल्याचा सूर येथे मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनात व्यक्त झाला. महाअधिवेशनात समाजातील समस्यांवर चर्चा होऊन त्यावर काय उपाययोजना होऊ शकतात याबाबत मान्यवरांनी मते व्यक्त केली.
मराठा समाज परिवर्तन चळवळ, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळ, मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ, क्षत्रिय मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला प्रबोधन मंडळ, मराठा समाज पंचमढी मंडळ व मराठा युवा मंच नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव गुंजाळ होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, दीपप्रज्वलन व ध्वजारोहणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. या वेळी मुंबई येथील अॅड.अभिजित पाटील, आरक्षण समितीचे राज्य समन्वयक संतोषराव साळुके, अहमदाबाद येथील उद्योजक प्रवीण नवले, ज्येष्ठ समाजसेवक भटूआप्पा वाघारे, आरक्षण समितीचे खान्देश विभाग अध्यक्ष श्यामभाऊ जाधव, जळगाव मराठा उद्योजक विकास मंडळाचे अध्यक्ष आनंदराव चौथे, अ.भा. सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे, बोईसर येथील उद्योजक व पत्रकार विठोबा मराठे, सुरत येथील क्षत्रिय मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक मनोज पवार, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेश जाधव, जळगाव येथील मराठा उद्योजक विकास मंडळाचे संचालक डॉ.धनंजय बेंद्रे, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाच्या सल्लागार डॉ.विजया गायकवाड, चाळीसगाव येथील शाहू मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा आरस्ता माळतकर, अलकनंदा भवर, आरक्षण समितीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विश्वासराव मराठे, सुरत मराठा कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.सी.डी. शिंदे, मराठा समाज मंगल कार्यालय समिती जळगावचे अध्यक्ष विष्णू बाळदे, बाळासाहेब मोङो, तुकाराम पिंजन, शालिग्राम मते, मराठा पंचमढी नंदुरबारचे अध्यक्ष श्रावण मराठे यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांनी चिंतन करून बदल स्वीकारणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई येथील अॅड.अभिजित पाटील यांनी मराठा आरक्षण मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली. अशोकराव गुंजाळ म्हणाले की, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाकडून समाज विकासाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात विविध समितींचे गठन करून त्यांच्याद्वारे कार्यक्रम घेण्यात येतील, असे सांगितले. मनोज पवार, सोमनाथ मराठे, राजेश जाधव, प्रवीण नवले, प्रा.ज्ञानेश्वर सोनवणे, जिजाबराव पवार, अलकनंदा भवर, आरस्ता माळतकर, प्रा.हिरामण मते, राजू मोरे, प्रा.किरण काळे, तुकाराम पिंजन, बाबूराव ढवळे, राजेंद्र जाधव आदींनी समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करणे, शैक्षणिक विकास, तरुणांच्या विवाहविषयक समस्या, नोकरी-रोजगाराची समस्या आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तरुण -तरुणींमधील मोबाईल व सोशल मिडियाच्या अतिवापराबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.
उल्लेखनीय कामगिरी
करणा:यांचा गौरव
या महाअधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा:या समाज बांधवांचाही गौरव करण्यात आला. त्यात शेती क्षेत्रातील काशीनाथ मिरघे, भटू बोराणे, पुरुषोत्तम चव्हाण, अंबालाल नवले, राजेंद्र बो:हाडे, किशोर साळुंके, भगवान मोगल, दिगंबर चव्हाण, रोहिदास मराठे, बारकू बोराणे, शांतीलाल गायकवाड, पंडित पवार. पत्रकारिता क्षेत्रातील नीलेश पवार, लक्ष्मण कदम, ईश्वर पाचोरे, सुधाकर मराठे, वसंत कदम, गणेश मराठे, सुरेश पवार, हिरालाल मराठे आदींचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट भजनी मंडळ म्हणून उमर्दे, काकर्दे व शिरुड येथील भजनी मंडळाच्या कलावंतांना तर आदर्श गाव म्हणून दहिंदुले, धमडाई, रांझणी, प्रतापपूर, असलोद या गावांना गौरविण्यात आले.
प्रास्ताविकातून क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीचे संस्थापक विठ्ठल मराठे यांनी महाअधिवेशन घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन किरण दाभाडे, धनराज मराठे व नंदराव कोते यांनी तर आभार शरद चव्हाण यांनी मानले.