चिखली येथे गारुडीच्या ताब्यातून सापाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:47 IST2019-09-27T12:47:53+5:302019-09-27T12:47:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील चिखली येथे सापाचा खेळ करणा:या गारुडीजवळील सापाची सुटका करून त्याच्यावर उपचार करून ...

चिखली येथे गारुडीच्या ताब्यातून सापाची सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील चिखली येथे सापाचा खेळ करणा:या गारुडीजवळील सापाची सुटका करून त्याच्यावर उपचार करून वनविभागाने त्याला पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, शहादा तालुक्यातील चिखली येथे सापाचा खेळ करून ग्रामस्थानंकडून पैसे उकळणारा मध्य प्रदेशातील गारुडी आल्याची माहिती शहादा येथील सर्पमित्र स्वप्नील इंगळे, जयेश बागले, गोपी शिंदे व महेश बोरसे यांना मिळाली. त्यांनी चिखली गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता गावात हा गारुडी कोब्रा जातीच्या सापाचा खेळ करीत होता. त्याला सापाविषयी विचारणा केली असता गारुडी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. गारुडीने सापाचे दात तोडून तोंड फेविस्टिकने चिपकून खेळ मांडत असल्याचे निर्दशनात आले. सर्पमित्रांनी तात्काळ वनविभाग शहादा येथे संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वनाधिकारी अभिजित पिंगळे, राकेश बोरसे यांनी भेट देत गारुडय़ाला सापाचा खेळ करणे कायद्याने गुन्हा आहे, अशी समज देण्यात आली. या वेळी सापावर प्राथमिक उपचार करून निसर्गात मुक्त करण्यात आले. सापाचा खेळ करणारे आढळल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.