पालिका इमारत येतेय आकारास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:56+5:302021-07-12T04:19:56+5:30

नंदुरबार : पालिकेची अद्ययावत प्रशासकीय इमारत आकारास येत आहे. जून २०२२ अखेरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...

The size of the municipal building | पालिका इमारत येतेय आकारास

पालिका इमारत येतेय आकारास

नंदुरबार : पालिकेची अद्ययावत प्रशासकीय इमारत आकारास येत आहे. जून २०२२ अखेरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहरातील जुन्या न्यायालयाच्या जागेवर पालिका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सर्व सोयींनीयुक्त व अद्ययावत अशी ही इमारत राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात अ वर्ग पालिकांच्या इमारतींमध्ये ही इमारत अव्वल दर्जाची राहील या दृष्टीने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी प्रयत्न केले आहेत. इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. जून २०२२ अखेर ही इमारत बांधकाम करून पूर्ण होण्याची शक्यता असून तशा सूचना पालिकेने संबंधित ठेकेदारास दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना काळातदेखील सर्व नियम पाळून काम सुरू होते.

सद्या पालिकेचे कामकाज जुन्या जेपीएन रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असून तेथे अडचणीचे ठरत आहे.

Web Title: The size of the municipal building