पेन्सिल तयार करून देतोय आयुष्याला आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:10 IST2019-05-05T13:10:39+5:302019-05-05T13:10:51+5:30

गणेश गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क  चिनोदा : अंथरुणाला खिळलेले वडील आणि ढासळलेली कुटूंबाची स्थिती यातून मार्ग काढत शिक्षण ...

The size of the life giving pencil | पेन्सिल तयार करून देतोय आयुष्याला आकार

पेन्सिल तयार करून देतोय आयुष्याला आकार

गणेश गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क 
चिनोदा : अंथरुणाला खिळलेले वडील आणि ढासळलेली कुटूंबाची स्थिती यातून मार्ग काढत शिक्षण घेऊन चांगला उद्योजक होण्याचे स्वपA पाहणा:या तळोद्यातील युवकाने पेन्सिल तयार करण्याचा उद्योग घरच्याघरी थाटून घेत आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला आह़े केवळ शिक्षणाच्या ध्यासाने त्याची ही वाटचाल सुरु आह़े 
तळोदा येथील राजेश बारोट यांना चार वर्षापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्याने ते अंथरुणाला खिळले होत़े यावेळी त्यांचा मुलगा नितेश हा नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता़ वडीलांचा पानाच्या टपरीचा व्यवसाय सांभाळत त्याने दहावीची परीक्षा दिली होती़ चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असताना आई, लहान भाऊ, बहीण आणि आजारी वडील यांची जबाबदारी डोक्यावर आल्याने शिक्षण सोडून व्यवसायाचा शोध त्याने सुरु केला़ मित्र कल्पेश यशवंत रामोळे याची मदत मोलाची ठरली़ शालेय विद्यार्थी वापरत असलेली पेन्सिल तयार करण्याचा उद्योग तो करु शकतो, असा आत्मविश्वास देऊन शहाद्यातील एका पेन्सिल कंपनीच्या मालकासोबत त्याची भेट घालून दिली़ नितेशला पेन्सिल बनवण्याचे कसब त्यांनी शिकवल़े काही दिवसात पेन्सिल बनवणे शिकल्यावर पैसे उधार उसनवार करुन त्याने 80 हजार रुपयांचे पेन्सिल तयार करण्याचे मशिन खरेदी केल्यानंतर त्याने आजवर मागे वळून पाहिलेले नाही़ आता शिक्षण पूर्ण करण्यासाठी नितेशचे प्रयत्न असून पेन्सिल तयार करण्याचे मशिन बनवण्यासाठी त्याची जुळवाजुळव सुरु आह़े  
 दिवसाला एक हजार पेन्सिल
पेन्सिल बनवणे एक उद्योग न राहता ती कला म्हणून कशी वाढेल याचा प्रयत्न नितेशचा आह़े दिवसाला 1 हजार पेन्सिल तयार करुन तो विविध      ठिकाणी विक्री करत  आह़े मालक, चालक, कामगार, वितरक अशी सर्वच कामे तो एकटाच करतो आह़े यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयचा कोर्स          पूर्ण करुन तो पेन्सिल उद्योगात नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न          करणार असल्याचे  सांगतो़
 

Web Title: The size of the life giving pencil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.