गणेश विसजर्नासाठी गेलेल्या वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 18:12 IST2019-09-06T18:12:06+5:302019-09-06T18:12:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ...

गणेश विसजर्नासाठी गेलेल्या वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील वडछील येथील सहा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली़ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावतलावात ही घटना घडली़
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयतांच्या नातेवाईकांसह पोलीस अधिका:यांनी तातडीने वडछील येथे भेट देत मयतांचे मृतदेह बाहेर काढल़े घटनेत कैलास संजय चित्रकथे (19), सचिन सुरेश चित्रकथे (19), विशाल मंगल चित्रकथे (17), दिपक सुरेश चित्रकथे(21), रविंद्र शंकर चित्रकथे (29), सागर आप्पा चित्रकथे (20) यांचा बुडून मृत्यू झाला़ यात प्रकाश लक्ष्मण चित्रकथे (26), बलराम राजेंद्र चित्रकथे (24), आकाश संजय चित्रकथे 16 हे जखमी झाले आहेत़ मयतांचे शवविच्छेदन म्हसावद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आल़े
वडछील येथे स्थापन केलेल्या गणपतीचे पाचव्या दिवशी विसजर्न करण्यासाठी सर्व युवक वाहनाने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावात आले होत़े दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते पाण्यात उतरले असता गाळ आणि खोलीचा अंदाज न आल्याने एकामागे एक पाण्यात बुडाल़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडछील येथील मयतांचे कुटूंबिय आणि नागरिक यांनी तलावाकडे धाव घेतली होती़ मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता़ उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला हे घटनास्थळी हजर झाले होत़े