जिल्ह्यातील सहा गावांना सुंदर गाव पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:50+5:302021-02-17T04:37:50+5:30
लोकसहभागातून चांगली कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे ...

जिल्ह्यातील सहा गावांना सुंदर गाव पुरस्काराने सन्मान
लोकसहभागातून चांगली कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे श्रीमती वळवी यांनी यावेळी सांगितले.
गावडे म्हणाले, पारितोषिक विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. श्री. रौंदळ यांनी प्रास्ताविकात पुरस्कार योजनेविषयी माहिती दिली. स्व. आर.आर. पाटील यांनी ग्रामविकासासाठी बहुमूल्य योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळदा ता.नंदुरबार, विसरवाडी, ता.नवापूर, लोणखेडा, ता.शहादा, रोझवे, ता. तळोदा, भाबलपूर, ता.अक्कलकुवा आणि खडक्या, ता. धडगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.