प्रवासी वाहनांची धडक सहाजण जखमी
By Admin | Updated: June 1, 2014 00:18 IST2014-06-01T00:18:58+5:302014-06-01T00:18:58+5:30
नंदुरबार : प्रवासी वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना खापरनजीक घडली. जखमी सर्व चोपडा व अमळनेर तालुक्यातील आहेत.

प्रवासी वाहनांची धडक सहाजण जखमी
नंदुरबार : प्रवासी वाहनांची समोरासमोर टक्कर झाल्याने सहाजण जखमी झाल्याची घटना खापरनजीक घडली. जखमी सर्व चोपडा व अमळनेर तालुक्यातील आहेत. पोलीस सूत्रांनुसार, अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर अक्कलकुवा-खापर रस्त्यावर हा अपघात झाला. खापरकडे जाणार्या भरधाव वेगातील जीप गाडीने (क्रमांक जीजे ६- व्हीव्ही ४०९९) समोरून येणार्या जीप गाडीला (क्रमांक एमएच १९ बीडब्ल्यू १३९९) जबर धडक दिली. त्यात ईश्वर मानू बोरसे रा.बोरचक, ता.अमळनेर, रघुनाथ उखा महाजन पिंप्री, ता.अमळनेर, जयश्री गणेश पाटील रा.लातूर, ता.चोपडा, सुमनबाई आत्माराम महाजन दहीवद, ता.अमळनेर, अनशाबाई नारायण महाजन रा.दहीवद, ता.अमळनेर हे जखमी झाले. जखमींना तातडीने अक्कलकुवा व खापर येथे दाखल करण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. याबाबत ईश्वर मानू बोरसे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पावरा करीत आहे. दरम्यान, या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व अपघात टाळावे, अशी मागणी होत आहे.