सहा जणांना शिक्षक पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:19 IST2019-09-05T12:19:29+5:302019-09-05T12:19:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सहा प्राथमिक शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुरुवार, 5 रोजी दुपारी ...

सहा जणांना शिक्षक पुरस्कार जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सहा प्राथमिक शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुरुवार, 5 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेत होणा:या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये देवराम भिला पाटील, जि.प.शाळा बालआमराई, ता.नंदुरबार, इंदूबाई दगा अहिरे, जि.प.शाळा घोडजामणे, ता.नवापूर. सचिन बाबपुराव पत्की, जि.प.शाळा बिलाडी, ता.शहादा. युवराज खंडू मराठे, जि.प.शाळा मोहिदा, ता.तळोदा. दिनेश सदाशिव पाडवी, जि.प.शाळा देवमोगरा, ता.अक्कलकुवा व रुपेशकुमार दिगंबर नागलगावे, जि.प.शाळा काल्लेखेतपाडा, ता.धडगाव यांचा समावेश आहे.
या शिक्षकांनी आपल्या सेवा काळात आणि आपल्या शाळेत विविध विद्यार्थीहिताचे आणि गुणवत्तेचे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याने त्याची दखल घेण्यात आली.
या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जि.प.सभागृहात होणा:या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड असतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस.सोनवणे, डीआयईसीपीडीचे प्राचार्य जालिंदर सावंत उपस्थित राहतील.
सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण यांनी केले आहे.