बंदमध्ये सहाही बाजार समित्या सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:40 IST2020-08-22T12:40:25+5:302020-08-22T12:40:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सहाही बाजार समितींनी शुक्रवारी बंद पाळला. दरम्यान, याच ...

बंदमध्ये सहाही बाजार समित्या सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सहाही बाजार समितींनी शुक्रवारी बंद पाळला. दरम्यान, याच कायद्याच्या निषेधार्थ नंदुरबार व्यापारी महाजन सामाजिक सांस्कृतिक असोसिएशनने देखील सोमवार, २४ रोजी बंदचे आयोजन केले आहे. यामुळे आता सलग चार दिवस बाजार समित्या बंद राहणार आहेत.
बाजार समितींबाबत राज्य शासनाने नवीन कायदा अंमलात आणण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार अध्यादेशाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. हा कायदा शेतकरी व बाजार समितींच्या जिवावर उठणार असल्याचा निषेधार्थ बाजार समिती संचालक आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी बंदचे आयोजन केले होते. त्याला जिल्ह्यातील सहाही बाजार समितींनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वच बाजार समितींमध्ये शुकशुकाट होता. सध्या धान्य मालाची आवक नसल्यामुळे फारसा आर्थिक फटका बसला नसल्याचे चित्र होते. नंदुरबार बाजार समितीत सकाळपासूनच शुकशुकाट होता. व्यापारी, कर्मचारी, हमाल, मापाडी हे देखील परिसरात दिसून आले नाहीत.
व्यापाºयांचाही बंद
याच कायद्याच्या निषेधार्थ व्यापारी देखील सोमवार, २४ रोजी बंद पाळणार आहेत. याबाबत व्यापारी महाजन सामाजिक सांस्कृतिक असोसिएशनने बाजार समिती सभापतींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्केट यार्ड मालविक्री वरील खर्च कमी करणे व एपीएमसी कायदे सुटसुटीत करण्यात यावा. मार्केटयार्ड मालविक्री वरील खर्च कमी करावा व एपीएमसी कायदा आणखी सुटसुटीत करावा. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा यासाठी लक्ष वेधण्याकरीता सोमवार, २४ रोजी एक दिवसांचा बंदचे आयोजन करण्यात येत असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
सलग चार दिवस बंद
बाजार समिती यामुळे आता सलग चार दिवस बंद राहणार आहे. शुक्रवारी बाजार समितींनीच पुकारलेला बंद, शनिवारी गणेश चतुर्थीची व रविवारची सुट्टी आणि सोमवारी व्यापाºयांचा बंद यामुळे सलग बाजार समिती बंद राहणार आहे. शेतकºयांनी या काळात आपला कृषीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे.