घराबाहेर झोपलेल्या दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून सहा लाखाची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:10 IST2019-06-12T12:10:35+5:302019-06-12T12:10:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील महात्मा गांधी नगरात घराबाहेर झोपलेल्या माय-लेकराच्या नाकात गुंगीचे औषध टाकून घरातील सहा लाख ...

घराबाहेर झोपलेल्या दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून सहा लाखाची घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील महात्मा गांधी नगरात घराबाहेर झोपलेल्या माय-लेकराच्या नाकात गुंगीचे औषध टाकून घरातील सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली़ घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
महात्मा गांधी नगरातील प्लॉट क्रमांक 120 मध्ये राहणारे वृत्तपत्र विक्रेते जगदीश नथू चौधरी व त्यांच्या आई राधाबाई घराच्या मुख्य दारासमोर झोपले होत़े दरम्यान मंगळवारी पहाटे 1 वाजेदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ चोरटय़ांनी लाईट लावून घरातील लोखंडी कपाट तोडून आतील लॉकरमध्ये ठवेलेले दोन लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे चार लाख रुपये किमतीचे दागिने असा सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला़ पहाटे चार वाजता चौधरी यांना जाग आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ आत जाऊन खात्री केली असता कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना दिसून आल़े त्यांनी तातडीने पोलीसांना कळवल्यानंतर घटना उजेडात आली़
पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर बडगूजर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जलाल शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़
पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेची माहिती शहरात वा:यासारखी पसरल्यानंतर वृत्तपत्र विक्रेते चौधरी यांच्याकडे गर्दी जमा झाली होती़ दरम्यान पोलीसांनी श्वानपथकास पाचारण केले होत़े महात्मा गांधी नगरातील माध्यमिक शाळेर्पयत श्वानाने माग काढला़ दरम्यान दोन दिवसापूर्वीच महात्मा गांधी नगर भागात असलेल्या पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद मोहन चौधरी यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला होता़ चोरटय़ांनी इन्व्हर्टरची बॅटरी चोरुन नेली होती़ याबाबत अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
चौधरी यांच्या घरातून चोरटय़ांनी लांबवलेले दागिने त्यांच्या बहिणीचे असल्याची माहिती आह़े रायगड येथे राहणा:या जगदीश चौधरी यांच्या बहिणीने घर बदल करण्याचे काम सुरु असल्याने दागिने भावाकडे ठेवण्यासाठी दिले होत़े यादरम्यान ही चोरी झाल्याने हळहळ व्यक्त होत होती़ चौधरी कुटूंबियांच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होत़े