प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावरील अपघातात सहा जखमी
By Admin | Updated: June 26, 2017 14:39 IST2017-06-26T14:39:31+5:302017-06-26T14:39:31+5:30
डामरखेडा ते प्रकाशा दरम्यान शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन ट्रक्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह सहा जण जखमी झाले आहेत.

प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावरील अपघातात सहा जखमी
ऑनलाईन लोकमत
प्रकाशा,दि.26 - डामरखेडा ते प्रकाशा दरम्यान शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन ट्रक्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह सहा जण जखमी झाले आहेत.
शिरपूर येथून मोरवी (गुजरात) येथे टाईल्स घेण्यासाठी जाणारा ट्रक (एम.एच.18 एसी- 3486) व प्रकाशाकडून शहाद्याकडे जाणारा ट्रक (एम.एच.04 सीयू-472) यांच्यात समोरासमोर धडक झाली. शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रकाशा-डामरखेडा दरम्यान असलेल्या कोकणमाता मंदिराजवळील वळणावर हा अपघात झाला. अपघातात दोन्ही ट्रक्सचा पुढील भाग चक्काचूर होऊन चारीत उतरले.
ट्रक चालक विजय धनगर व मनू छबीराम जयस्वाल यांच्यासह संजय कोळी, बाबूराम जयस्वाल, रामू जयस्वाल, राकेश जयस्वाल हे जखमी झाले. काही जखमींना क्रेनद्वारे बाहेर काढण्यात आले. जखमींना नंदुरबार व प्रकाशा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.