विसरवाडीतील आगीत गोडावूनसह सहा घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 13:03 IST2020-09-18T13:03:04+5:302020-09-18T13:03:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : आॅईल रिपॅकींगच्या गोडावूनला लागलेल्या आगीत गोडावूनसह शेजारील सहा घरे जळून खाक झाली. या घटनेत ...

विसरवाडीतील आगीत गोडावूनसह सहा घरे खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : आॅईल रिपॅकींगच्या गोडावूनला लागलेल्या आगीत गोडावूनसह शेजारील सहा घरे जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सक्रीटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आॅईल जळाल्याने त्यातून निघणारा काळा धूर पाच ते सहा किलोमिटर अंतरावरून दिसत होता. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. याबाबत विसरवाडी पोलिसात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
विसरवाडी येथील ग्रामपंचायत गल्लीत दिनेश प्रकाश जयस्वाल यांचे बालाजी इंटरप्रायजेस नावाचे वाहनांचे आॅईल रिपॅकींग करण्याचे गोडावून आहे. या ठिकाणी वाहनांचे आॅईल मोठ्या बॅरेलमधून आणून त्याचे एक, दोन, पाच लिटर असे लहान पॅकींग करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. अनेक वर्षापासून मध्यवस्तीत हा व्यवसाय सुरू आहे. गुरुवारी दुपारी अचानक या ठिकाणी आग लागली. गोडावूनमध्ये आॅईलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीच्या लपेट्यात शेजारील सहा घरे देखील आली. त्यात निलेश जयस्वाल यांची दोन घरे, निलेश श्यामलाल जयस्वाल, संदीप श्यामलाल जयस्वाल यांचे प्रत्येकी एक व सेवानिवृत्त शिक्षिका मंजुळाबाई सदाशिव चौधरी यांचे दोन घरे अशी एकुण सहा घरे आगीत खाक झाली. गोडावूनमधील मशिनरी, आॅईलचे ड्रम यासह संसारोपयोगी सामान असा लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच सरपंच बकाराम गावीत, विसरवाडीचे सहायक निरिक्षक संदीप पाटील, उपनिरिक्षक भूषण बैसाणे व कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. सरपंच व सहायक निरिक्षक यांनी स्वत: अग्निरोधक यंत्र हातात घेऊन आग विझविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा येथील अग्निशमन बंब दाखल झाले होते. परंतु तोपर्यंत गोडावून आणि सहा घरे खाक झाली होती. चार तासानंतर आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. धुराचे लोट सहा किलोमिटर अंतरावरून दिसून येत होते. त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले होते.
सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, नवापूरचे तहसीलदार सुनिता जºहाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तलाठी नरेंद्र महाले, मंडळ अधिकारी जयंत वसावे उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत विसरवाडी पोलिसात आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.
४आगीत सर्व संसार बेचिराख होत असल्याचे पाहून महिलांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.
४गुरुवारी विसरवाडीत बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. आगीची घटना कळल्यानंतर ते पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. आग विझविण्यासोबत गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.
४ग्रामस्थ तसेच गावातील युवकांनी देखील आपल्या परीने मिळेल त्या साधनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काहींनी आॅईलचे ड्रम बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.