अंडरपॅण्टवर बाहेर बसल्याने एकाला उचलून फेकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST2021-05-07T04:32:23+5:302021-05-07T04:32:23+5:30
नंदुरबार : अंडरपॅण्टवर घराबाहेर बसतो म्हणून वाद घालत एकाला तिघांनी बेदम मारहाण करीत हवेत वर फेकून खाली जोरात आदळून ...

अंडरपॅण्टवर बाहेर बसल्याने एकाला उचलून फेकले
नंदुरबार : अंडरपॅण्टवर घराबाहेर बसतो म्हणून वाद घालत एकाला तिघांनी बेदम मारहाण करीत हवेत वर फेकून खाली जोरात आदळून जखमी केल्याची घटना इंद्रीहट्टी, ता. नंदुरबार येथे घडली. तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रीहट्टी येथील बारकू ठेलारी हे त्यांच्या घराच्या ओट्यावर अंडरपॅण्टवर बसतात म्हणून शेजारी राहणारे शंकर पावबा भिल व इतरांनी त्यांच्याशी वाद घातला होता. त्या वादातून त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत बारकू ठेलारी यांना तिघांनी हवेत वर उचलून खाली जोरात आदळले. त्यात बारकू ठेलारी जखमी झाले.
याबाबत लक्ष्मीबाई बारकू ठेलारी यांनी फिर्याद दिल्याने शंकर पावबा भिल, मराभाई शंकर भिल, महेंद्र शंकर भिल यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपअधीक्षक सचिन हिरे करीत आहेत.