करणखेड्यात एकाच दिवसात आढळले १९ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:35+5:302021-02-25T04:39:35+5:30
नंदुरबार : करणखेडा, ता.शहादा येथे एकाच दिवसात तब्बल १९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे गावात ...

करणखेड्यात एकाच दिवसात आढळले १९ कोरोनाबाधित
नंदुरबार : करणखेडा, ता.शहादा येथे एकाच दिवसात तब्बल १९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे गावात उपाययोजना करण्यात येत आहेत.
करणखेडा येथील अनेकांची स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी १९ जणांचा स्वॅब रिपोर्ट हा पॅाझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गावात कोरोनाचा शिरकाव कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने प्रशासनही सतर्क झाले आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची आरोग्य तपासणी तसेच स्वॅब संकलन केले जात आहे. गावात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. गावकऱ्यांनी स्वत:हून स्वॅब देऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील शहादा तालुक्यातीलच बोरदतर्फे कलमाडी या गावातदेखील ४० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. ते गाव देखील काही दिवस हॅाटस्पॅाट ठरले होते. आता करणखेडा या गावात रुग्ण आढळल्याने कलमाडीही हॅाटस्पॅाट ठरते की काय अशी भीती व्यक्त होत आहे.