सिंहनाद पौर्णिमेनिमित्त शहाद्यात संदेश रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:34 IST2019-07-23T12:34:47+5:302019-07-23T12:34:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सिंहनाद पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणा:या आषाढी पौर्णिमेनिमित्त शहरातून संदेश रॅली काढण्यात आली. या रॅलीत ...

Singing rally message for martyrdom | सिंहनाद पौर्णिमेनिमित्त शहाद्यात संदेश रॅली

सिंहनाद पौर्णिमेनिमित्त शहाद्यात संदेश रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सिंहनाद पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणा:या आषाढी पौर्णिमेनिमित्त शहरातून संदेश रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो बौद्ध उपासक व उपसिका सहभागी झाल्या होत्या.
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेला तथागत बुध्द यांनी पाच परिव्राजकांना नवीन धम्मात दिक्षीत केले. या पौर्णिमेच्या अनुषंगाने असलेल्या मूळ घटनेच्या स्मृतींना उजाळा देणे व संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असलेला धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश सर्व स्तरातील लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी या संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  डॉ.बाबासाहेब पुतळा ते बोधीवृक्ष परिसर, संभाजीनगर असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत शहादा शहरातील शेकडो बौद्ध उपासक व उपसिका सहभागी झाले होते. रॅलीच्या अग्रस्थानी अमरावती येथील पूज्य भन्ते कौडण्य होते.  समारोपस्थळी  धम्मदेसना घेण्यात आली. संजय निकुंभे, विष्णू जोंधळे, दादाभाई पिंपळे, गोटू महिरे, अलका  जोंधळे, अर्चना निकुंभे, वैशाली पवार, सविता शिरसाठ, विजया पाटोळे, कविता कुवर व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या रॅलीत  राजमाता रमाई महिला मंच, प्रशिक बहुउद्देशीय मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, बिन नंदुरबार, फुले-आंबेडकर स्टडी सर्कल व समस्त बौद्ध समाज शहादा आदींसह विविध संस्था-संघटनांनीही सहभाग घेतला होता.
दरम्यान, आषाढी पौर्णिमेपासून बौद्ध धम्मातील वर्षावास उत्सवास सुरुवात झाली असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेर्पयत  बारा आठवडे भन्ते कौंडिण्य शहादा शहरात धम्मदेसना तसेच ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथांचे सामूहिक वाचन करणार आहेत.
 

Web Title: Singing rally message for martyrdom