सातपुडा लायन्स क्लबतर्फे शहाद्यात गीतगायन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:16 IST2020-09-12T12:15:51+5:302020-09-12T12:16:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लायन्स क्लब आॅफ शहादा सातपुडातर्फे गीतगायान स्पर्धेचे पारितोषिक व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ ...

सातपुडा लायन्स क्लबतर्फे शहाद्यात गीतगायन स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : लायन्स क्लब आॅफ शहादा सातपुडातर्फे गीतगायान स्पर्धेचे पारितोषिक व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ झाला.
आॅगस्ट क्रांती पर्वानिमित्ताने लायन्स क्लब शहादा सातपुडातर्फे शहादा तालुकास्तरीय आॅनलाईन देशभक्तीपर एकल गीतगायन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रा.ईश्वर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी संगीत अलंकार मधुकर पाटील, अॅड.गोविंद पाटील, पंकज गुजराथी, राजेंद्र शहा, चेतना गुजराथी, प्रा.अनिल साळुंके, चेतना चौधरी, विजेते स्पर्धक व पालक उपस्थित होते. एकल गीतगायन स्पर्धेत प्रथम अर्णव विजय बोढरे, द्वितीय कृतिका आनंदा पाटील, तृतीय रिद्धीका अनिल सोलंकी, दुसऱ्या गटात प्रथम रेवती विजय बोढरे, द्वितीय पर्वा मधुकर पाटील तर तृतीय हर्षदा प्रशांत शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार मधुकर पाटील व प्रा.गोविंद पाटील यांना प्रा. ईश्वर चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी प्रा.ईश्वर चौधरी, प्रा.मधुकर पाटील, अॅड.गोविंद पाटील, प्रा.अनिल साळुंके, नीलिमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.मधुकर पाटील व प्रा.महेंद्र खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र शहा यांनी केले.