रेशन दुकानदाराकडून मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:55 IST2020-03-13T12:55:39+5:302020-03-13T12:55:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले ...

The sin of ration shoplifting | रेशन दुकानदाराकडून मापात पाप

रेशन दुकानदाराकडून मापात पाप

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानात रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचे समोर आले आहे. त्यात कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी गावकऱ्यांनी रेशन धान्य वाटप बंद पाडले असून तहसीलदार यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पी.एस. रावताळे यांनी गुरुवारी सकाळी धान्य वाटप करण्यासाठी सुरुवात केली. लाभार्थी दिलेले धान्य घरी घेऊन जात होते. त्यातील एका लाभार्थीने घरी धान्य मोजले असता प्रत्येक धान्यामागे किमान दोन किलो धान्य कमी निघाल्याचे निदर्शनास आले. काही ग्रामस्थांनी रेशन दुकानात जाऊन धान्य घेतले व तेथेच नवीन मोजमाप केले. त्यात लाभार्थी युवराज जºया वाघ याला २० किलो तांदूळ दिले होते. मात्र ते पुन्हा मोजले असता १८ किलो ८०० ग्रॅम एवढे वजन भरल. १० किलो गहू हे आठ किलो ८०० ग्रॅम एवढेच भरले. यावरुन स्वस्त धान्य दुकानदार हा मापात पाप करीत असल्याचे स्पष्ट झाले. दिवाण सुकºया खर्डे यांनीही १६ किलो तांदूळ घेतले होते ते मुळात १४ किलो ७०० ग्रॅम एवढेच भरले. विशेषत: हे सर्व धान्य त्याच रेशन दुकानदाराच्या वजन काट्यावर मोजण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करीत दुकानाबाहेर एकच गर्दी केली होती. रेशन दुकानदार पीओएस माशीनमधील पावत्याही देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मोजून कमी भरलेले धान्य व वजन काटा गावकºयांनी ताब्यात घेऊन ग्रामपंचायतीच्या खोलीत जमा केला आहे व वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना दाखवू, असा पवित्रा घेतला आहे.

Web Title: The sin of ration shoplifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.