एकाचवेळी कोळपणी व औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:14 IST2019-08-18T12:14:13+5:302019-08-18T12:14:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत असताना त्याला औषध फवारणी पंप जोडून एकाचवेळी दोन्ही ...

Simultaneous spraying of drugs and drugs | एकाचवेळी कोळपणी व औषध फवारणी

एकाचवेळी कोळपणी व औषध फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत असताना त्याला औषध फवारणी पंप जोडून एकाचवेळी दोन्ही कामे करण्याचे उपकरण लहान शहादे, ता.नंदुरबार येथील शेतक:याने तयार केले आहे.
मजुरांची टंचाई, मजुरीचे वाढलेले दर यावर मात करण्यासाठी लहान शहादे येथील उपसरपंच भगवान मोहन पाटील यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे कमी वेळेत जास्त कामही होत आहे. भगवान पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात पाच फुटाचा गाळा घेऊन कापसाची लागवड केली आहे. सद्यस्थितीत मजुरांची मोठय़ा प्रमाणावर टंचाई भासत आहे. त्यातच मजुरीचे   वाढलेले दर परवड नसल्यासारखे झाले आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी ट्रॅक्टरद्वारे कोळपणी सुरू केली आहे. या ट्रॅक्टरवरच 125 लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवून ट्रॅक्टरच्या बॅटरीला लहान विद्युत मोटार जोडली आहे. त्याला फवारणीचे नोझल जोडून ट्रॅक्टरद्वारे जसजशी कोळपणीचे काम केले जाते  तसतशी औषध फवारणीदेखील करता येते. या उपकरणामुळे कमी वेळेत जास्त काम होत असल्याचा अनुभव भगवान पाटील यांना येत आहे. हे उपकरण पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतात भेटही देत आहेत.

Web Title: Simultaneous spraying of drugs and drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.