शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरुजींच्या जातीअंताच्या संदेशाचे तीळगूळ वाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:06 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...’ असा साऱ्या जगाला प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजींनी मकरसंक्रांतीच्या पंढरपूर लढ्याच्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेशाला उजळणी देण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत बिघडणाºया सामाजिक सलोख्यातील गोडवा वाढविण्यासाठी याच संदेशाचा तिळगूळ देऊन संक्रांतीचा सण साजरा करण्याची आवश्यकता आहे.संक्रांतीच्या सणाबाबत जनमानसात अनेक समज-गैरसमज आहेत. त्याला विज्ञानाची जोड आहे आणि अंधश्रद्धेची काळी किनारही आहे. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो. या पार्श्वभूमीवर बुधवारी साजरा होणारा मकरसंक्रांतीच्या सणाला साने गुरुजींचे विचार समाजाला खºया अर्थाने दिशादर्शक ठरणारे आहेत.साने गुरुजींच्या मते संक्रांत म्हणजे स्वत:ला उत्क्रांत करण्याचा सण. त्यामुळे या सणाला प्रत्येकाने स्वत:मध्ये उत्क्रांत घडवून नवा बदल करण्याची गरज आहे. विशेषत: त्यांची पंढरपूर येथील उपोषणानिमित्त प्रचार आणि जनजागरणाच्या दौºयातील आठवण ही खºया अर्थाने आजच्या परिस्थितीत समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राजा मंगळवेढेकर यांनी साने गुरुजींच्या जीवनगाथा या ग्रंथात ही आठवण सांगितली आहे. १९४६ साली पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांना दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून गुरुजींनी प्राणांतिक उपोषणाचा लढा दिला होता. त्यात त्यांनी यासंदर्भातील घटना मांडताना लिहिले आहे की, ‘१४ जानेवारी मकरसंक्रांतीचा सण होता. त्यादिवशी साने गुरुजींनी पंढरपूरच्या प्रचारसभेसाठी नागोठ्याला गेले होते. दुपारी सभा झाली. सभेला आसपासच्या खेड्यांमधून बरेच लोक आले होते. सभेनंतर एक हरिजन बंधू व्यासपीठावर आला. त्याने गुरुजींना संक्रांतीचा तिळगूळ दिला. त्याला प्रतिसाद देत गुरुजींनीही त्याच्या तोंडात तिळगूळ घातला आणि मोठ्या प्रेमाने त्याला कडकडून मिठी मारली. सारे भेदभाव तिथेच गळून पडले. गुरुजींनी मारलेली मिठी म्हणजे इतके दिवस दुरावलेल्या दोन हृदयांची भेट होती ती...’ अर्थातच गुरुजींनी त्यावेळी दिलेला जातीअंताचा संदेश आज समाजासाठी उपयुक्त असून त्याच्याच एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीचा गोडवा अधिकच मधूर करण्याची गरज आहे.