Vidhan Sabha 2019: चूप चूप बैठे हो जरूर कोई बात है..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 13:00 IST2019-09-27T12:59:59+5:302019-09-27T13:00:36+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची ...

Vidhan Sabha 2019: चूप चूप बैठे हो जरूर कोई बात है..
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पक्षांतराच्या वादळात जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरतेचे सावट निर्माण झाले असतांना जिल्ह्यातील काँग्रेसची धूरा सांभाळणारे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी हे निवडणुकीच्या घडामोडीत अद्यापही पूर्वीप्रमाणे प्रभावीपणे सक्रीय न झाल्याने अनेक नवीन चर्चाना उधान आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा राखीव आहेत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसची धूरा गेल्या काही वर्षापासून जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हेच सांभाळत आहेत. त्यामुळे जिल्हाभर त्यांचा वैयक्तिक प्रभाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये त्यांची भुमिका काँग्रेस पक्षात महत्वाची राहिली आहे. गेल्या वर्षी आजारपणामुळे वर्षभर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे फारसे सक्रीय नव्हते. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आता सार्वजनिक जिवनात सक्रीय झाल्याने या विधानसभा निवडणुकीत ते अधीक सक्रीय होतील असा काँग्रेस कार्यकत्र्याचे म्हणने आहे.
सध्या जिल्ह्यातून काँग्रेसच्या दोन मोठय़ा कार्यकत्र्यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील हे दोन्ही नेते भाजपवासी झाले आहे. त्यांना पक्षांतरापासून रोखण्याचा काँग्रेसचा प्रय} झाले नसल्याची चर्चा आहे. किंबहुना पक्षांतराची चर्चा आता बडय़ा नेत्यांभोवतीच येवून घोंगाळत आहे. आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चार महिन्यांपूर्वी चर्चा होती. त्यावेळी त्यांनी स्वप्नातही काँग्रेस सोडण्याचा विचार येणार नाही असा खुलासा केला होता. त्यानंतर ही चर्चा थांबली होती. आता पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे नुकताच कौटूंबिक कार्यक्रम झाला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी देखील मिश्किलपणे काही चर्चा रंगल्या होत्या.
सध्या विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील चारही जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्याचे पक्ष पातळीवर चर्चा आहे. पक्षाचे सूत्र सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अॅड.के.सी.पाडवी यांच्याकडे आहे. राज्याच्या समितीवर त्यांची निवड झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यात मात्र आमदार रघुवंशी यांच्या व्यक्तीगत सर्वच मतदारसंघात प्रभाव आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते चारही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आहे. एरव्ही कुठलीही निवडणूक लागली की आमदार रघुवंशी यांचे जिल्हाभर दौरे, मेळावे सुरू होतात. विरोधकांवर आक्रमकपणे ते शब्द शैलीतून वार करतात. त्यामुळे राजकारणात रंगत येते आणि काँग्रेस कार्यकत्र्यामध्येही उत्साह संचारतो. यावेळी मात्र अद्याप तरी तशी स्थिती निर्माण झालेली नाही. रघुवंशींनी स्थानिक स्तरावर घेतलेल्या कार्यकत्र्याच्या बैठका, नेत्यांशी हितगूज वगळता जाहीरपणे ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी समोर आलेले दिसत नाही. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये पुन्हा किंतू, परंतूचा शंका सुरू झाल्या असून आमदार रघुवंशी कधी पूर्वीप्रमाणे काँग्रेस कार्यकत्र्यामधील मरगळ दूर करण्यासाठी मैदानात उतरतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.