आजाराने मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:12 PM2019-11-21T12:12:06+5:302019-11-21T12:12:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार ...

Sickness session begins | आजाराने मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरूच

आजाराने मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार शनिमांडळसह तालुक्याच्या पूर्वेकडील अन्य गावांमध्ये दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर सततच्या पावसामुळे रोगराई निर्माण झाली असून ब:याच मेंडय़ा दगावल्या आहे. तर आजही रोगग्रस्त मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरुच असल्याचे बलवंड येथील मेंडपाळांकडून सागण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व नंतरही सुरुच राहिलेल्या पावसामुळे अवघा जिल्हा धास्तावला गेला. पिकांचे मोठे नुकसान              झाल्याने श्ेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. त्याशिवाय या पावसामुळे जिल्ह्यातील पशुधनही प्रभावित झाले. त्यात पावसाच्या दृष्टीने संवेदनशिल असलेल्या मेंडय़ांवर अधिक परिणाम झाला आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील शनिमांडळ, रजाळे, बलवंड यासह अन्य गावांमध्ये मेंडीपालन व्यवसायाचे प्रमाण अधिक असून तेथील  मेंडय़ा यंदाच्या पावसामुळे संकटात सापडल्या आहे. मेंडय़ांच्या अंगावरील लोकर ओले होऊन, खुरीला माती लागून मेंडय़ावर अनेक आजार   निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. त्याशिवाय सततच्या पावसामुळेच मेंडय़ांना दिला जाणारा चारा ओला होऊन काळा पडला आहे. मेंडपाळांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे काही प्रमाणात तसाच चारा दिला गेल्यामुळे मेंडय़ांचे आरोग्य अधिकच संवेदनशिल झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
मागील दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या आजारांमुळे अनेक  मेंडय़ा दगावल्याचे मेंडपाळांकडून सांगण्यात आले. शनिमांडळ, रजाळे व बलवंड या भागात मेंडय़ा मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यात बलवंड येथील तुकाराम ठेलारी, खेमा ठेलारी, दिमाबाई ठेलारी, भगत हरी ठेलारी, बबलू ठेलारी, दादा लखन ठेलारी, ताना ठेलारी, रघुनाथ ठेलारी, नाना खंडू ठेलारी, भावडा ठेलारी, पांडा ठेलारी, आना खंडू ठेलारी, जना ठेलारी, दशरथ ठेलारी, रामा ठेलारी, मसाबाई ठेलारी सुका ठेलारी यांच्या मेंडय़ा दगावल्याचे सांगत मेंडपाळांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे देखील सांगण्यात आले. 
जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत रोगराई पसरलेल्या मेंडय़ांवर उपचार करण्यात आला असूनही अनेक मेंडय़ा वाचल्या नसल्याचे मेंडपाळांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय शेकडो मेंडय़ा दगावल्यानंतरही मेंडय़ांचे मृत्यूसत्र सुरूच असल्याचे असल्याची व्यथा बलवंड येथील मेंडपाळांमार्फत मांडण्यात येत आहे. आजाराचे निदान करण्यासाठी दगावलेल्या मेंडय़ांचे शवविच्छदन करतांनाच काही नमुने देखील घेण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले आहे. 


 

Web Title: Sickness session begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.