नागङिारीसह चौपाळे गावात ‘शुकशुकाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:36 IST2018-10-04T12:36:18+5:302018-10-04T12:36:22+5:30

नागङिारीसह चौपाळे गावात ‘शुकशुकाट’
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वावद लघु तलावालगत चौपाळे ग्रामपंचायतीच्या विहिरीबाबत पाटबंधारे विभागाने दिलेल्या नोटीसचा निषेध करणा:या संतप्त जमावाने कृष्णा पार्क रिसॉर्टची तोडफोड केली होती़ या प्रकारानंतर चौपाळेसह नागङिारी शिवारात बुधवारी दिवसभर शुकशुकाट होता़ पोलीसांकडून तोडफोड केल्याप्रकरणी संशयितांची धरपकड सुरु असल्याने व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असल्ळाने चौपाळे गावात चिटपाखरूही नव्हत़े
पाटबंधारे विभागाच्या वावद लघुतलावालगत नागङिारी येथील विहिरीतून चौपाळे गावासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो़ याच ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने कृष्णा पार्क आणि रिसॉर्ट सुरू करण्यात आले आह़े तलावातील पाणी हे संरक्षित असल्याने त्याचा उपसा किंवा परिसरात कूपनलिका करण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागत़े परंतू गत ऑक्टोबर महिन्यापासून तलाव क्षेत्रात कूपनलिका केल्याचा वाद सुरु झाला होता़ याबाबत पाटबंधारे विभागाने काही शेतक:यांना नोटीसा बजावल्या होत्या़ कूपनलिका बंद व्हाव्यात यासाठी नाशिक येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आदेश काढले होत़े शेतक:यांकडून या नोटीसांचा वेळावेळी निषेध करण्यात येऊन सिंचन व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती़ दरम्यान चौपाळे गावाला पाणीपुरवठा करणा:या विहिरीबाबत पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीला नोटीस बजावल्याने वादाला तोंड फुटले होत़े या वादातून मंगळवारी अचानक जमावाने कृष्णापार्क रिसॉर्टमध्ये तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली होती़ तोडफोडीमुळे रिसॉर्टचे नुकसान झाले असून मुख्य इमारतीतील निवासी खोल्यांसह शोभेच्या विविध वस्तूं, झाडांच्या कुंडय़ा, सौरऊज्रेचे पथदिवे, लोखंडी कंपाउंड, भांडारगृह, सीसीटीव्ही, दुचाकी यांची तोडफोड करण्यात आली होती़ पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर जागोजागी खिडक्यांच्या काचा विखुरलेल्या दिसून आल्या़ मुख्य काउंटरसह जागोजागी तुटलेल्या वस्तू पडून होत्या़
या घटनेनंतर चौपाळे गावात भयाण शांतता असल्याचे दिसून आल़े चौपाळे फाटय़ापासून हाकेच्या अंतरावरील माध्यमिक विद्यालयात तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या शाळेत मोजके विद्यार्थी उपस्थित होत़े गावातून लगतच्या परिसरातील इंग्लिश मेडियम स्कूलमधील विद्यार्थी प्रोजेक्टसाठी गेल्याचे सांगण्यात आल़े या घटनेचा सर्वात मोठा फटका शेतकरी बांधवांना बसला आह़े आधीच पाण्याअभावी पिके कोमेजली आहेत़ त्यात ज्वारी आणि मका या पिकांची कापणी सुरू होती़ परंतू या घटनेनंतर ही कापणी थांबली आह़े मजूरच नसल्याने दिवसभर इतर शेतीकामेही होऊ शकलेली नाहीत.