विठ्ठल मंदिरात यंदाही शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:29+5:302021-07-21T04:21:29+5:30
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यंदाही आषाढी एकादशी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यातून मंदिरेही बंद ठेवण्यात ...

विठ्ठल मंदिरात यंदाही शुकशुकाट
नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यंदाही आषाढी एकादशी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यातून मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. शहरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर यंदाही बंद असल्याने, भाविकांनी लांबूनच विठ्ठलाचे दर्शन घेत नमन केले.
जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्येही यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात आले. शहरातील पटेलवाडी परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिरात सकाळी साडेपाच वाजेपासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला होता. सकाळी सहा वाजता राहुल चाैधरी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. मंदिरात तुळशीच्या माळा आणि फुलांनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आकर्षकपणे सजविण्यात आली होती.
दरम्यान, सायंकाळी महाआरती नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मनोज रघुवंशी व कविता रघुवंशी, तसेच नगरसेवक यशवर्धन रघुवंशी व कल्याणी रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नगरसेविका मनीषा वळवी, शोभा पवार, चेतन वळवी हे उपस्थित होते मंदिराचे पुजारी भूषण कुलकर्णी यांनी विधिवत पूजा केली. सकाळपासून या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या तर्फे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविक दिवसभर लांबूनच दर्शन घेत परत जात होते.