‘तुकाराम’चा दुस:यांदा शोले ट्रेलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 22:14 IST2019-11-13T22:14:09+5:302019-11-13T22:14:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरवासीयांना बुधवारी एका अनोख्या आंदोलनाचा अनुभव मिळाला. युतीच्या सरकारसाठी तुकाराम भिका पाटील (वय 45) ...

‘तुकाराम’चा दुस:यांदा शोले ट्रेलर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरवासीयांना बुधवारी एका अनोख्या आंदोलनाचा अनुभव मिळाला. युतीच्या सरकारसाठी तुकाराम भिका पाटील (वय 45) या माजी शिवसैनिकाने मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. शोले स्टाईल झालेल्या या आंदोलनाचा ‘दी-एण्ड’ साडेपाच तासांनी अर्थात साडेचार वाजता झाला. दरम्यान, तुकाराम यांचे हे याच टॉवरवरील आणि अशाच पद्धतीचे हे दुसरे आंदोलन होते. मागण्या मात्र वेगवेगळ्या होत्या.
सध्या राज्यात सरकार स्थापनेवरून राजकीय खेळ सुरू आहे. शिवसेना आणि आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे सरकार सत्तेवर येईल यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. याच दरम्यान राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली आहे. भाजप व शिवसेना युती गेल्या तीन दशकांची असल्यामुळे युती न तोडता दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे अशी मागणी कार्ली, ता.नंदुरबार येथील शिवसैनिक तुकाराम भिका पाटील यांनी करीत थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. तब्बल पाच तास त्याचे हे आंदोलन सुरू राहिले.
11 वाजता आले लक्षात
नंदुरबार शहरातील धुळे रोडवरील गोपाळ नगरात असलेल्या मोबाईल टॉवरवर एक व्यक्ती चढला असल्याची बाब सकाळी 11 वाजता स्थानिकांच्या लक्षात आली. तोर्पयत या आंदोलकाने मिडियाच्या काही प्रतिनिधींना फोनही करून दिला होता. पोलिसांना लागलीच ही बाब कळविण्यात आली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून खाली येण्याचे आवाहन केले. परंतु मागणी पुर्ण होत नाही तोर्पयत आपण वरच राहू असे सांगितले.
पोलिसांचे प्रय}
पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधला. परंतु उपयोग झाला नाही. तब्बल साडेपाच तास अर्थात सायंकाळी साडेचार वाजेर्पयत तो टॉवरवरच होता. अखेर मिडियाच्या प्रतिनिधींनी त्याचे म्हणने शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिका:यांर्पयत पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर तुकाराम पाटील टॉवरवरून खाली येण्यास राजी झाले.
बघ्यांची गर्दी
तुकाराम पाटील यांचे आंदोलन सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. दुपारी साडेचार वाजेर्पयत पोलीस बंदोबस्तासह बघ्याची गर्दी कायम होती. सहायक पोलीस निरिक्षक एस.आर.दिवटे, फौजदार भूषण बैसाणे, हवालदार कन्हैया पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जयेश गावीत, इमराण खाटीक यांनी बंदोबस्त ठेवला.
परिसरातील नागरिक हैराण
या टॉवरवर अशा प्रकारचे हे दुसरे आंदोलन झाले. वारंवारच्या या प्रकारामुळे या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. मोबाईल टॉवर कंपनीने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे किंवा आत कुणी जावू नये यासाठी पक्के कुंपन करणे आवश्यक होते. परंतु तशा काहीही उपाययोजना झाल्या नाहीत.
4वर्षभरापूर्वी याच व्यक्तीने अर्थात तुकाराम भिका पाटील यांनीच याच टॉवरवर चढून आंदोलन करीत प्रशासनाला जेरीस आणले होते. आपल्या शेतात खाजगी मोबाईल कंपनीने टॉवर उभारणीसंदर्भात फसवणूक केल्याच्या आरोप करीत चौकशीची मागणी त्यांनी त्या आंदोलनावेळी केली होती. तेंव्हा देखील तीन ते चार तास त्याने प्रशासनाला वेठीस धरले होते. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा त्यावेळी येथे भर उन्हात राबला होता. आता पुन्हा तुकाराम हेच या टॉवरवर चढले.
तुकाराम पाटील हे कार्ली, ता.नंदुरबार येथील शेतकरी आहेत. 2003 ते 2013 र्पयत ते शिवसेनेचे गावातील शाखा प्रमुख असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. शिवसेनेवर आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा आहे. त्यामुळे सेनेने समविचारी पक्षासोबतच जावे, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जावू नये अशी त्यांनी भावना व्यक्त केली. जनादेश युतीला दिलेला आहे. त्यामुळे युतीनेच सत्ता स्थापन करावी असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
टॉवरवर चढण्यापूर्वी तुकाराम पाटील यांनी टॉवरच्या परिसरात करण्यात आलेल्या कुंपनाच्या गेटवर चिठ्ठी चिटकवली. त्यात त्याने आपले म्हणने मांडले. त्यानंतर मिडियाला प्रतिक्रिया लागते म्हणून त्याने स्वत:च मिडिया प्रतिनिधींना तयार केलेला त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ दिला. टॉवरवर उंचावर बसूनच त्यांनी तो व्हिडीओ तयार केला होता. याचा अर्थ पुर्ण तयारीनिशी तुकाराम पाटील हे आंदोलनाच्या ठिकाणी आले होते हे स्पष्ट होते.