नाचण्याच्या वादातून शेहीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:59 IST2019-06-25T11:59:03+5:302019-06-25T11:59:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील शेही येथे लगAात नाचण्याच्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली़ होती़ याप्रकरणी ...

Shuffle action by dancing | नाचण्याच्या वादातून शेहीत हाणामारी

नाचण्याच्या वादातून शेहीत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील शेही येथे लगAात नाचण्याच्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली़ होती़ याप्रकरणी रविवारी दुस:या गटाने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ 
शेही येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता लगAात नाचण्यावरुन दोन गटात वाद झाला होता़ यावेळी पियुष वळवी व मनोज विवेकानंद वळवी या दोघांना संजय विष्णू वळवी, आशिष विष्णू वळवी, नितेश शंकर वळवी, विष्णू जोलू वसावे, अजरुन सिंगा वसावे, भिमसिंग सिंगा वळवी, अमृत परसराम वळवी, शिरीष अजरुन वळवी, गावजी कोमाजी वसावे सर्व रा़ शेही यांनी लाठय़ा काठय़ा व हाताबुक्कीने मारहाण केली होती़ दरम्यान दोघांना सर्व 9 संशयितांनी शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ मनोज वळवी याने दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व 9 संशयितांविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक गावीत करत आहेत़ 
 

Web Title: Shuffle action by dancing