श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातर्फे पोळा सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:57+5:302021-09-06T04:34:57+5:30
पोळा हा सण शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा-राजाच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी पिठोरी अमावस्येला शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सध्या ...

श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयातर्फे पोळा सण साजरा
पोळा हा सण शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा-राजाच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी पिठोरी अमावस्येला शेतकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सध्या कोरोनामुळे आठवीपासून पुढे वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, सणांचे महत्त्व कळावे, यासाठी फेस, ता. शहादा येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी पोळा सणाच्या पूर्वसंध्येला शाळेत मातीच्या बैलांच्या प्रतिकृती तयार करून गावातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले व त्याचे पूजन करण्यास सांगितले. यातून पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच सणाचे महत्त्वही विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले जात आहे. या वेळी गावातून ट्रॅक्टरवर बैलाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी या प्रतिकृतीचे पूजन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक के.एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक के.बी. पाटील, गायत्री चौधरी, मंजुश्री पाटील, विजयसिंग ठाकूर, जयेश पाटील, जयदेव पाटील, के.के. कुंभार, परेश पाटील, अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.