लोणखेडा येथे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:34+5:302021-07-31T04:30:34+5:30

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने येथे सुसज्ज मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार ...

Shri Ganeshmurti Pranapratishtha ceremony at Lonkheda | लोणखेडा येथे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

लोणखेडा येथे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने येथे सुसज्ज मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत हा सोहळा झाला. २३ जुलै रोजी शोभायात्रा, स्वतीवाचन, पंचांग पूजनम, गणपतीपूजन, पुण्यहवाचन, मातृकास्थापनम्, नांदीश्राध्दम, जलाधिवास, सर्व देव प्रतिष्ठा हा विधी करण्यात आला. २४ जुलै रोजी सर्वतोभद्रमंडल, गणेश मंडल, सर्वदेव पूजा, धान्यदिवस, मूर्तिन्यासविधीचे आयोजन करण्यात आले. २५जुलै रोजी सहस्त्र आवर्तन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, स्थिर लग्न, मोदक स्वाकार, पूर्णाहुती, उत्तरांगहवन विधीचे शास्त्रसहित पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हा सर्व कार्यक्रम जयनगर, ता. शहादा येथील ह.भ.प. श्री भागवताचार्य सुनील पुरुषोत्तम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. हे आकर्षक मंदिर शहादा ते सातपुडा कारखाना रस्त्यालगत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. कार्यक्रमासाठी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट लोणखेडा, भजनी मंडळ व लोणखेडा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shri Ganeshmurti Pranapratishtha ceremony at Lonkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.