नंदुरबार येथे श्रामणेर शिबीरास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:25 IST2019-11-07T12:25:01+5:302019-11-07T12:25:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धम्मचक्र प्र्वतन दिनानिमित्त सामाजिक परिवर्तन संघ व भारतीय भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच ...

नंदुरबार येथे श्रामणेर शिबीरास सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धम्मचक्र प्र्वतन दिनानिमित्त सामाजिक परिवर्तन संघ व भारतीय भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय निवासी श्रामणेर दिक्षा संस्कार विधी शिबिर घेण्यात येत आहे.
शिबीराचे उद्घाटन बौध्द धम्मगुरु गुणर}जी महाथेरो, भदन्त धम्मरक्षीत, भदंत प्रज्ञादीप, भदंत जीक्क, भदंत बुध्द र} यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सामाजिक परिवर्तन संघाचे मार्गदर्शक अभियंता डी.के नेरकर, सुलभा महिरे, सुनिल महिरे आदी उपस्थित होते.
नंदुरबार येथील जेतवन महाबुध्द विहार येथे शिबीर होत आहे. या शिबीरात श्रामणेर दिक्षा संस्कार विधी दिक्षार्थिना बौध्दधम्म पंचशिल धम्मगाथा, अष्टगाथा पूजाविधी, बौध्दधम्माचे प्रतिज्ञा यासह अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबीरात औरंगाबादच्या गायिका कडुबाई खरात यांच्या भिमगितांचा कार्यक्रमही होणार आहे.
यावेळी शिबीरात पूज्य भदंत गुणर}जी महाथेरो यांनी बाबासाहेबांचे विचार मांडत दैनदिन जीवनातील बदलांना विश्वशांतीचे जनक भगवान गौतम बुध्द यांचे आचारणात आण:याची गरज असल्याचे सांगितले. अभियंता नेरकर यांनी विद्यार्थी हा आजचा नागरीक असून त्याला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज असल्याचे सांगितले. सुलभा महिरे यांनी शिबीरात पुरुषांसह महिलांनीही सहभागी होण्याचे ेआवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धर्मराज करणकाळे यांनी केले, तर आभार किरण गवळे यांनी मानले.